*कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न*

*कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न*

पंढरपूर/प्रतिनिध

- रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते कर्मवीरांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करण्यात आली. 
            कर्मवीर जयंतीनिमित्त सातारा येथील मुख्यालयातून ऑनलाईनद्वारे जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरदश्चंद्र पवार साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल प्रथमच राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात येवून २०२०-२१ चा पहिलाच पुरस्कार 'कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार 'भाई गणपतराव देशमुख' यांना घोषित केला. तर २०२०-२१ 'रयतमाउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कारा'साठी अहमदनगर येथील सौ. राहिबाई पोपेरे यांची निवड करण्यात आली. या निवडीची घोषणा झाल्यामुळे शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
                महाविद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमास 
उपप्राचार्य तथा अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ बजरंग शितोळे, उपप्राचार्य व अधिष्ठाता डॉ. लतिका बागल, स्वायत्त समन्वयक डॉ. मधुकर जडल, महाविद्यालय अंतर्गत सुधार समितीचे समन्वयक डॉ. अमर कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, समारंभ समितीचे चेअरमन डॉ. दत्तात्रय डांगे, ज्युनिअर उपप्राचार्य डी. आर. शिंदे, व्होकेशनल विभागाचे प्रमुख तानाजी बाबर, कार्यालयीन प्रमुख अनंता जाधव, सिनियर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.