*करकंब येथे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत पारधी समाजाच्या कुटुंबास भेट*

*करकंब येथे ऑपरेशन परिवर्तन अंतर्गत पारधी समाजाच्या कुटुंबास भेट*

करकंब/ प्रतिनिधी

 पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजातील लोकांना हातभट्ट्या दारू काढण्यापासून परावृत्त करून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर सन्मानजनक व्यवसायासाठी लागणारे कर्ज, शासकीय माहिती अथवा गाव अथवा पोलिस ठाण्यातून मिळावी. जिल्हा दारू मुक्त व्हावा या उदात्त हेतूने ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे. त्या अनुषंगाने मा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस ठाण्यातील प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी करकंब मध्ये ऑपरेशन परिवर्तन च्या माध्यमातून करकंब व करकंब ठाण्यांतर्गत येत असल्या गावातील पारधी समाजातील लोकांना भेट देऊन त्या संदर्भात चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करून समाजाच्या प्रवाहात येऊन या अवैध व्यवसायापासून परावृत्त होण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले. यावेळी करकंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनीही  पारधी समाजातील लोकांना हातभट्टी व्यवसाय न करतामुलांचे शिक्षण, नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी संबंधित तसेच शेती करण्यासाठी व कुटुंबासाठी पूरक असणारे व्यवसाय करणे बाबत मार्गदर्शन केले

.
 यावेळी करकंब पोलीस ठाणे अंतर्गत ऑपरेशन परिवर्तन च्या माध्यमातून करकंब येथील झिरपे वस्ती येथे पोलीस हवालदार आर आर जाधव, पोलीस नाईक सज्जन भोसले, दया हजारे यांनी हातभट्टी व्यवसायाबाबत तपासणी केली परंतु त्यांना काही मिळून आले नाही. त्यांनी या ठिकाणी भेट देऊन या ऑपरेशन परिवर्तन याबाबत होणारे फायदे ची माहिती दिली.बोचरे वस्ती या ठिकाणी भेट दिली असता तेथे दैवत हातभट्टी व्यवसाय बाबत तपासणी केली. पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस हवालदार अजित रानगट, पोलीस नाईक पाटेकर पोलीस नाईक फुगेयांनी भेट देऊन या ऑपरेशन परिवर्तनच याबाबत माहिती सांगून मुलांचे शिक्षण सुरू ठेवण्याबाबत चे मार्गदर्शन केले. गुंजाळ वस्ती,हराळे वस्ती, नवभारत नाला करकंब पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 26 गावांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे यांच्या सूचनेप्रमाणे अवैध दारूमुक्त करून ऑपरेशन परिवर्तन जोरात सुरू आहे.
   यावेळी  करकंब पोलिस बीट अंतर्गत पोलीस हवालदार कैलास हरिहर, पोलीस नाईक संदीप गिरमकर, पोलीस नाईक रमेश फुगे, महिला पोलीस नाईक सिंधू पवार यांनीही ऑपरेशन परिवर्तन च्या माध्यमातून पारधी समाजातील लोकांना मार्गदर्शन केले.