*खरे दांपत्याकडून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी वृषाली नामदेव सरवदे हीचा सन्मान* *पेनूरच्या शाळेसाठी ११लाखाची गिफ्ट*

पंढरपूर/प्रतीनिधी
मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी आपला मतदार संघातील दौरा सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी तूर्तास तरी अगोदर समाजसेवा आणि नंतर राजकारण ही पद्धत वापरली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी विकासकामासाठी शासकीय निधीसह स्वनिधी देण्यावर भर दिला आहे. रविवारी पेनुर येथील मानाजीराव माने यांच्या खाजगी शाळेला ११लाखाचा सरकारी निधी मिळाल्याचा चेक दिला आहे. तर मतदार संघातील नाजिक पिपरी येथील वृषाली नामदेव सरवदे या विद्यार्थिनीने एम पी एस सी परीक्षेत यश मिळविले बद्दल खरे दांपत्याकडून सन्मान करण्यात आला आहे.
डॉ. वृषाली नामदेव सरवदे यांची पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट -अ परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. या सन्मान सोहळा प्रसंगी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे , पत्नी सौ.तृप्तीताई राजु खरे, यांच्या हस्ते पुष्पहार श्रीफळ,शाल घालून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी नामदेव सरवदे, दिपक साबळेसर, रविंद्र शेवडे. उपस्थित होते
.
पेनूर येथे मागील तीन महिन्यांपूर्वी गावभेट दौरा सुरू होता. त्यावेळी येथील शाळेच्या इमारतीची अवस्था चांगली नव्हती. शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चवरे यांनी त्याबाबत मदत करण्यासाठी सुचविले होते. यावर तात्काळ राजू खरे यांनी होकार देत सुसज्ज आशा इमारतीसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या सहकार्याने सी एस आर निधीतून पहिल्या टप्यात ११लाख रुपयाचा धनादेश निघाला आहे. हा धनादेश विक्रांत माने आणि शाळेचे कर्मचारी यांचेकडे राजू खरे यांनी रविवारी सकाळी सुपूर्द केला आहे. एवढेच नाही तर यापुढील काळातही या शाळेच्या इमारतीला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाहीही राजू खरे यांनी यावेळी दिली आहे.
हा धनादेश सुपूर्द करताना मोहोळ तालुक्यातील शिवसेनेचे प्रकाश पारवे, दादासाहेब पवार,उमाकांत करंडे, समाधान खंदारे, दादासाहेब कर्णवर, अमर सोनवले, लखन वाघमारे, नेमिनाथ शिरसट, सोनुदादा शिंदे, आकाश फडतरे यांच्यासह मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.