*विठ्ठलचा मंगळवारी गळीत हंगाम शुभारंभ* *पंढरपूरचे राजकारण फिरविणारे अनेक दिग्गज नेत्यांनी राहणार प्रमुख उपस्थिती* *स्व.आ.भारतनाना भालके यांच्या कट्टर शिलेदारांना दिला आहे मोठा सन्मान*

पंढरपूर/प्रतीनीधी
पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असलेल्या श्री विठ्ठल सह साखर कारखान्याच्या ४२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार २४ऑक्टोंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. यासाठी मान्यवर मंडळीसह ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते मोळी टाकण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून स्व. आ. भारतनाना भालके यांचे कट्टर शिलेदार यांना मोठा सन्मान दिला आहे.
मंगळवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर सकाळी १०वाजता होणाऱ्या या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंच सोलापूरच्या अध्यक्षा शोभा श्रीकांत मोरे, महाराष्ट्र सह बँक मुंबईचे सदस्य अविनाश महागावकर,जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, आणि या कारखान्याचे ज्येष्ठ सभासद हरी पाटील (कौठाली), खंडू सुरवसे (कोर्टी), सुखदेव हाके (कोर्टी), औदुंबर पोरे(वाखरी), वसंत वाघ (नांदोरे ), दगडू भोसले(रोपळे), बाब्रुवान भोसले(सरकोली). यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हणीत टाकण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे वेळी माजी नगरसेवक संतोष नेहतराव, धनंजय कोतालकर, माजी नगराध्यक्ष प्रताप गंगेकर, माजी उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, मंगळवेढा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष चंद्रशेखर
कोंडूभैरी, तालुका अध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, काँग्रेसचे नेते नागेश गंगेकर, समाजसेवक आरुणभाऊ कोळी, किरणराज घाडगे, निलेश आंबरे, आदित्य फत्तेपूरकर, बालाजी मलपे, आर पी आय चे संतोष पवार, माजी नगरसेवक शिवाजी मस्के, सतीश शिंदे, ऋषिकेश भालेराव, प्रशांत मलपे, नागेश यादव आदी समाजसेवक, माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
वरील कार्यक्रमासाठी सर्वांनी कारखाना कार्यस्थळावर वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील, व्हा. चेअरमन प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, आणि कार्यकारी संचालक डी.आर.गायकवाड यांनी केले आहे.