*प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचाही झाला मोठा गौरव* *राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता समारंभासाठी सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती*

पंढरपूर /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तब्बल 24दिवस निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता बुधवार दि 16 ऑक्टोबर रोजी झाली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. अमोल कोल्हे यांचेसह पक्षातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी पंढरपूरचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांचा सन्मानचिन्ह देवून यथोचित सन्मान पक्षाचे वतीने करण्यात आला.
इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा सांगता समारंभ देशाचे नेते शरदचंद्र पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ,खा.डॉ अमोल कोल्हे,खा .धैर्यशील मोहिते पाटील,खा.निलेश लंके,सिक्किमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील,मा.मंत्री बाळासाहेब पाटील तसेच आ.सुमनताई पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख,विद्यार्थी संघटना प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे.,सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख पंडीत कांबळे ,मा.आ.राजु आवळे,उत्तमराव जानकर,मा.आ,नारायण आबा,अनिल सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,युवकचे प्रदेश सरचिटणीस अरूण आसबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब जाधव राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी विभागाचे राज्य कार्यकारणी सदस्य विजय काळे,यांचे प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी शिवस्वराज्य यात्रेत ९ आॕगस्ट २०२४ ते १६ आॕक्टोबर २०२४ या कालावधीत २४ दिवस ७३६५ कि.मी.चा प्रवास करीत तब्बल १९ जिल्ह्यात शिव स्वराज्य यात्रेत सहभागी होऊन, पवार साहेबांचे विचार पक्षाची भुमिका जनतेपर्यंत पोहचविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
नागेश फाटे यांनी आता पर्यंत पक्षाच्या उद्योग व व्यापार विभागात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अतंत्य चोखपणे पार पाडत असताना,फाटे यांनी उद्योग व व्यापार विभाग संपूर्ण राज्यात वाढविण्याचे काम केले आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ पातळीवर फाटे यांना मानाचेच स्थान मिळत आहे. मोजक्या लोकांच्या मधूनही हा सन्मान केला गेला आहे.हीच त्यांच्या निष्ठेची मोठी पोचपावती आहे.