*जुळे सोलापूरातील पाचशे महिला शिवसेनेत करणार प्रवेश* *शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांची माहिती*

*जुळे सोलापूरातील पाचशे महिला शिवसेनेत करणार प्रवेश*  *शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांची माहिती*

पंढरपूर/प्रतिनिधी

जुळे सोलापूर येथील सुमारे पाचशे महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. 
याबाबत जुळे सोलापूर येथे शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. 
यावेळी येथील महिलांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्धार केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे विचार व पक्षाची भूमिका समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. 
या संदर्भात सोलापूर इंडस्ट्रीज मधील अनेक उद्योग कंपन्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाताला काम उपलब्ध होईल यासाठी सुद्धा मा उद्योगमंत्री सामंत यांच्या माध्यमातून महिला भगिनींना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा विश्वास शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी उपस्थित महिलांना दिला.
यावेळी छाया पगार यांनी देखील शिवसेना पक्षाशी सर्व महिला भगिनींनी जोडल्या गेल्या पाहिजे कारण महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री यांनी महिला सबलीकरणाचे धोरण राबविले आहे. यामुळे या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्या रोहिणी महेश साठे, छाया पगारे रंजना ईरकर, लता बंडगर, सुनीता शिंदे, ललिता साळे, सुनिता सुरवसे, भाग्यश्री इरकर व शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या. 
लवकरच हजारोच्या संख्येने महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती महेश साठे यांनी दिली.