*गावची जत्रा.. कारभारी सतरा.. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होतोय खतरा....!* *खा...दी राजकीय सोयरिकी ने हैरान... तर खा...की राजकारणामुळे हतबल....?* *ग्रामपंचायत व प्रशासनाचा भोंगळ कारभार... वाहतूक पोलिसांची पूर्णता डोळेझाक.*

*गावची जत्रा.. कारभारी सतरा.. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होतोय खतरा....!*  *खा...दी राजकीय सोयरिकी ने हैरान... तर खा...की राजकारणामुळे हतबल....?*  *ग्रामपंचायत व प्रशासनाचा भोंगळ कारभार... वाहतूक पोलिसांची पूर्णता डोळेझाक.*

करकंब /प्रतिनिधी

:-करकंब हे पंढरपूर तालुक्याचे सर्वात मोठ्या लोकसंख्येचे निमशहरी गाव असून हे गाव ऐतिहासिक प्राचीन सांस्कृतिक धार्मिक विशेषता राजकीय दृष्टीने तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखले जाते. या गावाला मोडनिंब चौक ते थोरली वेस पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा विळखा पडला असून याला राजकीय आशीर्वादाने मिळाल्याने तेरी भी चूप ..मेरी भी चुप ... अशी अवस्था झाल्यामुळे अगदी करकंब एसटी स्टँड पासून ते थोरल्या वेशीपर्यंत तसेच आता चौक ते सोमवार पेठ (स्टेट बँक), करकंब व परिसरातील येणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून वाहतुकीच्या कोंडीचा प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणीही वाहनधारक कोठेही - कसेही आडवे -तिडवे रस्त्यावर वाहन लावून दुकानांमध्ये मनमोकळेपणाने गप्पा मारत, खरेदी करत बसतात. रस्त्यावरच लोकांनी वाळू, बांधकाम साहित्य , टाकल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. याकडे ग्रामपंचायत व प्रशासनाचे आणि वाहतूक पोलिसांचे पूर्णता दुर्लक्ष होत असून सडक छाप रोडरोमिओ भरधाव वेगाने गावातून वाहने चालवत असतात. अशा वाहनधारकांवर व बेशिस्त वाहनधारकांवर करकंब पोलीस कारवाई का करत नाहीत. व ग्रामपंचायत दुर्लक्ष का करते , अशाच सडकछाप रोड रोमिओ आणि बेशिस्त वाहनधारकांवर मुळे ग्रामस्थांना याचा मोठा मनस्ताप व नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाहतूक पोलीस हायवेवरच कारवाई करण्यात मग्न असून चिरीमिरी कारवाई करण्यापेक्षा गावात येऊन कारवाई करावी. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाने भोंगळ कारभार न करता बेकायदेशीरपणे रस्त्यावर अतिक्रमण करून वाहनचालकांना तसेच मोठ्या वाहनचालकांना नाहक अडथळा निर्माण करत असल्याने अशा लोकांवर नोटीस देऊन फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. मात्र याकडे राजकीय सोयीसाठी ग्रामपंचायत कानाडोळा करत याची चर्चाही सुज्ञ नागरिकांतून केली जाते. तर पोलीस हि याकडे डोळेझाक करून तसेच निघून जातात. त्यामुळे याचा फायदा सडक छाप रोडरोमिओ, बेशिस्त वाहन धारक, तसेच अठरा वर्षाच्या आतील मुले बेधडकपणे भरधाव पणे गावातून वाहन चालवून छोटा -मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या करकंब एसटी स्टँड ते पुरवत गल्ली (मसोबा चौक) ते आतार चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोठी अवजड वाहने व्यापारी व्यवसायिक आणत असल्याने त्यातच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन निर्माण होत आहे .याकडे स्थानिक ग्रामपंचायत चे सरपंच व ग्राम विकास अधिकारी हेही कानाडोळा करीत असल्याने वाहतूक कोंडीला अधिक चालना मिळत आहे. अशा बेजबाबदार वागणाऱ्या वाहनधारकांवर ,व्यापाऱ्यांवर अतिक्रमण करणाऱ्या लोकांवर करकंब ग्रामपंचायतने विशेष ग्रामसभा घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये .अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी करकंब नगरीमध्ये अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणात विळखा पडला असून याला जबाबदार ग्राम विकास अधिकारी असल्याचे लोकांमधून बोलले जात असून संबंधित लोकांना ग्राम विकास अधिकारी यांनी नोटीस देऊन काहीही कारवाई केली नसल्याचे बोलले जात आहे.
या वाहतूक कोंडी कडे करकंब पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पूर्णतः दुर्लक्ष असल्यामुळे याचाही गैरफायदा हे वाहतूक कोंडी ला जबाबदार असणारे लोक घेत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करकंब पोलीस ठाण्याकडून का केली जात नाही. संबंधित वाहतूक कोंडीला व रस्त्यावर आडवे तिडवे वाहन लावणाऱ्या वाहनधारकांवर गावातून वेगाने वाहन चालवणाऱ्या वर तसेच अवजड वाहने गावात घेऊन येणाऱ्या वर आज पर्यंत वाहतूक पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे लोकातून बोलले जात असून करकंब पोलीस ठाणे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी गत निर्माण झाल्याचे सामान्य नागरिकांतून बोलले जात आहे. विशेषता म्हणजे करकंब पोलीस ठाणे अतिक्रमणाच्या विळख्यातआहे.
करकंब गावातून मुख्य मार्ग एक असल्याने या मार्गावरून शाळा ,महाविद्यालय व परगावी जाण्यासाठी महिला आबालवृद्ध ,बाल गोपाळ तसेच ग्रामस्थांची व बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मोठ्या प्रमाणात ये- जा होत असते. त्यामुळे या लोकांना या वाहतुकीचा प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असतो .गावातील विविध धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम यात्रा ,जत्रा आदी विविध लोकांची सतत वर्दळ सुरू असते. या वाहतूक कोंडीचा सामना लोकांना करावा लागतो. आज सामान्य लोकांपासून विशेषता महिलावर्गाला याचा प्रचंड त्रास होत असून गावची जत्रा.... कारभारी सतरा.... वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होतोय खतरा.....! अशी चर्चा नागरिकांतून केली जात आहे.