*चिलाईवाडी खून प्रकरणातील एका आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात; दोघेजण फरार ....!* *न्यायालयाकडून आरोपीस चार दिवसाची पोलीस कस्टडी.*

करकंब/ प्रतिनिधी
:-गेल्या दहा वर्षांपासून असलेल्या शेताच्या रस्त्याच्या वादातून चिलाईवाडी ता. पंढरपूर येथील वामन दशरथ जमदाडे .(वय-६० वर्षे) या शेतकऱ्याच खून करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती.असून याबाबत करकंब पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने करकंब पोलिसांनी या चिलाईवाडी खून प्रकरणातील एका आरोपीस ताब्यात घेतले असून या आरोपीस पंढरपूर न्यायालयासमोर उभे केले असता या आरोपीस न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या खून प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वामन दशरथ जमदाडे व अनिल कुंडलिक माळी, दत्तात्रेय कुंडलिक माळी, भारत कुंडलिक माळी. राहणार चिलाईवाडी ता. पंढरपूर यांचे मध्ये शेतातील रस्त्याच्या कारणावरून गेली दहा वर्षा पासून वाद होता. रस्त्याच्या वादामुळे वरील दोघांमध्ये पंढरपूर येथील दिवाणी कोर्टात दावा दाखल केलेला होता. त्याची सुनावनी करिता दिनांक-१०/०३/२०२३ रोजी वामन दशरथ जमदाडे तसेच चुलत भावाचा मुलगा बाळासाहेब नागनाथ जमदाडे, नानासो बाबासो सलगर, असे कोर्टात गेले असता भारत कुंडलिक माळी याने वामन दशरथ जमदाडे यांना तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती. दिलेली धमकी वामन जमदाडे यांनी घरी सांगितलेली होती. म्हणून अनिल कुंडलिक माळी, दत्तात्रय कुंडलिक माळी, पुंडलिक माळी यांनी वामन दशरथ जमदाडे यांना रस्त्याचे वादाचे कारणावरून कोणत्यातरी अज्ञात हत्याराने डोक्यात मारून ठार मारले आहे अशी फिर्याद रमेश वामन जमदाडे यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आरोपी यांचे विरोधात करकंब पोलीस ठाणे गु. रजि. नं. 102/2023 कलम 302, 201,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक- निलेश तारू हे करीत आहेत.