*करकंबच्या महाराजास आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी* -* मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियातून बदनामी प्रकरण

करकंब/प्रतिनिधी)
सध्या मोठ्या प्रमाणात अँड्रॉइड मोबाईल प्रत्येक घरात पोहचले आहेत. मग अशातच अनेक व्हाट्सएप गृप ही प्रत्येक गावात झाले आहेत.मात्र आलेल्या पोस्ट खातरजमा न करता जशाच्या तश्या सोशल मीडियावर फॉरवर्ड केल्या जातात.अशीच करकंब मध्ये एक घटना घडली होती.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार करकंब मध्ये असलेल्या शूरवीर महाराणा प्रताप या व्हाट्सअप्प ग्रुपवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेची बदनामी करणारी पोस्ट येथील रामनारायणदास गोपालदास बैरागी महाराज यांनी टाकली यामुळे करकंब पोलिसात युवा सेना पंढरपूर तालुका प्रमुख रणजित कदम यांच्या तक्रारी वरून आरोपीविरोधात कलम 295,153,500 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 65 ई/अ या कलमाखाली करकंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेचा तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील करीत आहेत.
या घटनेचा तपास अत्यंत वेगाने करीत पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनेतील संशयित आरोपी रामणारायनदास गोपालदास बैरागी महाराज याला शनिवारी कोर्टासमोर हजर केले असता दि.28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.सदरची पोस्ट महाराज यांचे नाशिक येथील मित्राने पाठविल्याने पुढील तपास कामी या महाराजास पोलीस कोठडी दि.1 जुलै 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.