*‘कर्मवीर’ मध्ये पोष्टर स्पर्धा संपन्न*

पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक एड्स दिन पंधरवडा’ व ‘न्यू इंडिया@ 75 जनजागृती अभियान’ निमित्त ‘एच. आय. व्ही. व ‘स्वेच्छा रक्तदान’ या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी पोष्टर निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनुक्रमे कु. अश्विनी खरात, अंकिता राऊत व श्रावणी भोसले यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. त्यांना अनुक्रमे रुपये पाच हजार, तीन हजार व दोन हजार व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत परीक्षक म्हणून उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, डॉ. राजाराम राठोड व ग्रंथपाल डॉ. विनया पाटील यांनी काम केले. या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे पुरुषोत्तम कदम, नागेश कदम, उपस्थिती – ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य बाळासाहेब शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, डॉ. दत्तात्रय चौधरी, डॉ. नवनाथ पिसे, डॉ. अमोल ममलय्या, प्रा. कल्याण वटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
....................