*श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांमध्ये आबा च्या रूपाने निर्माण झाली नवीन आशा ,विठ्ठल ला मिळणार राज्यात वेगळी दिशा*

*श्री विठ्ठल कारखान्याच्या सभासदांमध्ये आबा च्या रूपाने निर्माण झाली नवीन आशा ,विठ्ठल ला मिळणार राज्यात वेगळी दिशा*

करकंब /प्रतिनिधी:

-गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यातच नव्हे राज्यात चर्चेत असलेल्या शेतकऱ्यांचा राजवाडा अर्थात पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार कर्मयोगी कै. औदुंबर आण्णा पाटील यांनी तळहाताच्या फोडा  प्रमाणे हा विठ्ठल कारखाना.. सभासद... कर्मचारी यांच्या विषयी जपलेला आदर... त्यांची असलेली प्रचंड तळमळ आणि या  कारखान्याची दुरावस्था.. अशातच गेल्या कित्येक वर्षापासून अण्णांची तळमळ,, सभासद,,, कर्मचारी यांचे दुःख सावरण्यासाठी व या कारखान्याला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी एका नवीन आत्मविश्वासाने पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आबा नावाच्या माणसाने श्रीविठ्ठलाच्या सभासदांमध्ये कर्मचारी आणि सर्वसामान्यांमध्ये वेगळी क्रेझ निर्माण झाल्याने विठ्ठलाच्या सभासदांमध्ये नवीन आशा निर्माण झाल्याने पंढरपूर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात वेगळी दिशा मिळणार असल्याचे पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून जे विठ्ठल च्या सभासद कर्मचारी व सामान्य वर्गातून ग्राउंड रिपोर्ट घेतले असता प्रत्यक्षदर्शींनी चित्र हे पहावयास मिळाले . त्यामुळे काही दिवसावर येऊन ठेपलेल्या या श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आबा उर्फ अभिजीत पाटील यांच्या हाती श्री विठ्ठला चा झेंडा सभासद सोपवणार असल्याचे संकेत ... आणि चर्चाही राजकीय वर्तुळातून केली जात आहे.
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये अभिजीत पाटील यांनी काही दिवसातच या विठ्ठल च्या बाबतीत आपली स्पष्ट भूमिका केली होती. अण्णांची असलेली तळमळ सभासदांचे दुःख या सर्वांची जाणीव ठेवून पूर्ण आत्मविश्वासाने हा कारखाना पुन्हा सुरू करून राज्यामध्ये नावारूपाला आणून गतवैभव प्राप्त करून देऊन कर्मयोगी कै. माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रमाणे.... सभासद या नावाला पुन्हा.... डिमांड या तालुक्यातच नव्हे राज्यात निर्माण करणार असल्याची चर्चाही ग्रामीण भागातून होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील येणाऱ्या ग्रामीण भागातील ज्या ज्या भागात आबा उर्फ अभिजीत पाटील  जातात. त्या ग्रामीण भागांमध्ये श्रीविठ्ठल चे सभासद असलेले तसेच सर्वसामान्य ग्रामस्थ युवक वर्ग मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अशी आत्मविश्वासाने साद देऊन त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.हा शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल कारखाना चालू करून  सभासदांना पूर्वीप्रमाणे कै.  अण्णांच्या रूपाने आबा अभिजीत पाटील निश्चित पणाने न्याय देतील असा आत्मविश्वास सभासदांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असल्याने त्यातच आबा उर्फअभिजीत पाटील हेही सभासद कर्मचारी सामान्य जनता यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, घेऊन त्यांना मोठ्या आत्मविश्वासाने आदरपूर्वक चौकशी करून या निवडणुकीच्या निमित्ताने या विठ्ठला चा झेंडा हाती सोपवणार का ? असे विचारताच ज्येष्ठ  सभासदा मधून आम्ही तुमच्या सोबत आहोत.. पर्यंत खूप सहन केले. खूप सोसले पण आबा तुम्ही लढा ...आम्ही तुमच्या सोबत असल्याचे आदरयुक्त सांगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.