*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ड्रीमसिटी, करकंब येथे  महिला दिन   उत्साहात  संपन्न*

*प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ड्रीमसिटी, करकंब येथे  महिला दिन   उत्साहात  संपन्न*

करकंब /प्रतिनिधी
ब्रह्माकुमारीज् संस्थेने भारताच्या स्वातंत्र्याच्या "अमृत महोत्सवा कडून स्वर्णिम भारताकडे" या विषयावर विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. याच धरतीवर उपशाखा ड्रीम सिटी करकंब येथे 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या. रजनीताई देशमुख (जि.प. महिला बाल कल्याण सभापती ), स्मिताताई पाटील (कान्हापूरी सरपंच ), डॉक्टर स्नेहा पुरवत (स्त्री रोग तज्ञ ), खंदारे सर ( जि.प. प्रा. शाळा).
यावेळी करकंब शाखेच्या संचालिका ब्रह्माकुमारी अनिता दीदी यांनी महिलांनी एक दुसर्याचा सन्मान कसा ठेवायचा व कसा द्यायचा यावर मार्ग दर्शन केले. तसेच सरपंच पाटील ताईनी महिलांनी न घाबरता सशक्त महिलांना सशक्त बनविण्यासाठी वेगवेगळ्या महिलांची उदाहरणे सांगितली, तसेच डॉक्टर स्नेहा मैडमनी स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. सभापती रजनी ताईनी संस्कारा विषयी मार्ग दर्शन केले. तर खंदारे सरांनी महिलांना मोबाईल चे दुष्परिणाम काय होतात ते सांगितले. या कार्यक्रमाला 75 महिला उपस्थित होत्या.