*करकंब पोलीस ठाण्याचे नूतन सपोनि निलेश तारू यांचा विशेष सत्कार*.

करकंब/ प्रतिनिधी.
करकंब पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारु यांनी नुकताच करकंब पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर कान्हापुरी तालुका पंढरपूर येथील नूतन सरपंच प्रेम भैया चव्हाण यांनी सपोनि निलेश तारु यांचा सत्कार केला. तसेच कोविड योद्धा म्हणून पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे अजित मोरे, पोलीस हे. का. सिरमा गोडसे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पराठे युवा नेते सागर शिंदे आदी सह पोलीस बांधव उपस्थित होते.