*भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन मा.अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सर्व रोग निदान आरोग्य शिबीर संपन्न*

पंढरपूर/प्रतिनीधी
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हाईस चेअरमन मा. श्री. अनिल(दादा) सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुक्यातील रडडे येथे भव्य सर्व रोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व्हाईस चेअरमन मा.श्री.अनिल(दादा) सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री मा.प्रा. लक्ष्मण ढोबळे सर उपस्थित होते. या शिबिरात स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉ.शरद शिर्के व डॉ. प्रिती शिर्के, अस्थिरोग तज्ञ डॉ.आकाश चिवंडे, बालरोग तज्ञ डॉ.अमोल परदेशी, सोनोग्राफी व एक्सरे तज्ञ डॉ.रविकांत हिंगमिरे, मेडिसन तज्ञ डॉ.अमोल चव्हाण, त्वचारोग तज्ञ डॉ. निलेश ननवरे व डॉ.अश्विनी ननवरे, नेत्र तज्ञ डॉ.रणदीप कदम, डॉ. ऋतुजा बाबर, डॉ. रुचिका लांडे इ.उपस्थित होते. या शिबिरात 350 जणांनी लाभ घेतला.
या शिबिरास पंचायत समिति सदस्य सुरेश कांबळे, संचालक दामाजी कारखाना सुरेश कोळेकर, रघुनाथ पडोळकर, माजी सभापती सुनील थोरबोले, दत्ता कांबळे, बाळासाहेब रूपनर, किरण सांगोलकर, बंडू सांगोलकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे सत्कार मुख्य शेती अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शेती अधिकारी कृष्णदेव लोंढे यांनी केले. यावेळी शेती विभाग कर्मचारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.