*जेवढा आनंद आमदार झाल्यावर झाला नव्हता तेवढा आनंद मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नाला होकार मिळाल्यावर झाला - आ समाधान आवताडे *आ आवताडे यांची मंगळवेढ्यात भव्य मिरवणूक व नागरी सत्कार संपन्न*

*जेवढा आनंद आमदार झाल्यावर झाला नव्हता तेवढा आनंद मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नाला होकार मिळाल्यावर झाला - आ समाधान आवताडे *आ आवताडे यांची मंगळवेढ्यात भव्य मिरवणूक व नागरी सत्कार संपन्न*

प्रतिनिधी/प्रतिनिधी 
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात निवडून आल्यावर मला जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद अधिवेशनात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीला होकार मिळाल्यावर मला झाला होता या उपसा सिंचन योजनेला 578 कोटी रुपयांची गरज असून निधी उपलब्ध करून योजना मार्गी लावण्याचा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असून लवकरच निधी मिळवून या तालुक्यातील दुष्काळात जन्मलेल्या माझ्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही असा शब्द आ समाधान आवताडे यांनी नागरी सत्काराला उत्तर देताना दिले

.
तत्पूर्वी मंगळवेढा तालुक्यातील 24 गावचा पाणी प्रश्न अधिवेशनात मांडून उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचेकडून अधिवेशनानंतर सात दिवसाच्या आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी घेऊन त्यानंतर सात दिवसात कॅबिनेट लावून विशेष बाब म्हणून मंजूर करून घेऊ असा शब्द घेतल्याने काल अधिवेशन संपवून पहिल्यांदा आ. समाधानदादा आवताडे हे मतदारसंघात आल्यानंतर 24 गावातील शेतकरी व मतदार संघातील कार्यकर्त्यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढून त्यांचे स्वागत केले.
यावेळी पुढे बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की 
50 वर्षात रखडलेली काम अडीच वर्षात पूर्ण करणार असून अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत पौट साठवण तलाव,भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना,बसवेश्वर स्मारक,गुंजेगाव पुलाचा प्रश्न,एमआयडीसी चा प्रश्न,ग्रामीण रुग्णालय,रस्त्यांचे प्रश्न,असे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आ आवताडे यांनी बोलताना दिले.यावेळी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.