*लऊळ हद्दीत झालेल्या अपघातातील विकास शहा यांचा उपचारादरम्यान मृत्यू.*

करकंब/ प्रतिनिधी :
-शेटफळ कुर्डुवाडी रोडवर लऊळ हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी झालेले विकास विजयकुमार शहा वय 58 वर्षे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला माहिती अशी की,13 मे रोजी विकास विजयकुमार शहा रा. करकंब ता. पंढरपूर हे कुर्डूवाडी शहरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी इको कार क्र. एम. एच.१३ इसी-१३४७ या गाडीने येत असताना लऊळ हद्दीतील विहार ढाब्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप क्र. एम. एच. ०९ एफझेड- ८८४३ या वाहनचालकांने हयगयीने वाहन चालवून धडक दिली.
सदरील धडक इतकी भयंकर होती की, इको कारचा दरवाजा कापत जाऊन चालक विकास विजयकुमार शहा यांच्या पायात घुसला.विकास शहा यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान शहा यांच्या मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.