*करकंब येथे पथनाट्य सादरीकरणाने जागतिक जल दिवस संपन्न* *करकंब येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य* *पूर्वी पाण्यासाठी पाण्यासारखा खर्च केला जायचा... आज जल है तो कल है.....!*

*करकंब येथे पथनाट्य सादरीकरणाने जागतिक जल दिवस संपन्न*  *करकंब येथील स्काऊट गाईड विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य* *पूर्वी पाण्यासाठी पाण्यासारखा खर्च केला जायचा... आज जल है तो कल है.....!*


*करकंब /प्रतिनिधी:-*

*येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कूल व महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्यु काॅलेज येथील स्काऊट गाईड विभागाच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त प्रबोधनात्मक *"थेंब प्रत्येक महत्वाचा"* पथनाट्य सादर केले.
      *२२ मार्च हा प्रतिवर्षी जागतिक जल दिवस जगभरात साजरा होतो. याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे पिण्यास योग्य असलेल्या ताज्या स्वच्छ  पाण्याचे महत्त्व प्रत्येकास समजावे. आपल्या पृथ्वीवर ९७ टक्के पाणी महासागरात साठलेले आहे. उरलेले तीन टक्के पाणी ताज्या रूपात असते त्यातील २ टक्के बर्फाच्या रूपात आहे आणि उरलेले १ टक्का पाणी भूगर्भात, ओल्या जमिनीत, वाहत्या नद्या, तलाव, विहिरी, धरणे यामध्ये उपलब्ध असते*
    *या ताज्या पाण्याचा सन्मान करावा, त्याचे प्रदूषण करू नये, प्रत्येक थेंब जपून वापरावा, पाण्याचा अपव्यय टाळावा हे पथनाट्य सादरीकरण करून भूगर्भातील हजारो वर्षांपासून साठलेले पाणी अतिशय मौल्यवान आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे महत्त्व सर्व ग्रामस्थांना समजावून सांगण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले*.
         प्रशालेतील राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळ व स्काऊट गाईड विभाग करकंब यांच्या संयुक्त विद्यमाने बसस्टॅड,थोरली वेस,बाजारकट्टा येथे पथनाट्य सादर केले.
या पथनाट्य पथकाला प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम, स्काऊट शिक्षक आणि राष्ट्रीय हरित सेना विभागाचे समन्वयक महादेव पुजारी, मिथुन चंदनशिवे,शुकूर बागवान, नामदेव सलगर या़चे मार्गदर्शन लाभले
*चला करूया पाण्याचे संरक्षण....*
 ‌.             जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारअधिकारी दिलीप स्वामी यांनी एक दिवस आगोदरच पाण्याचे असलेले महत्त्व पटवून पूर्वी पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जायचा अशी पूर्वीप्रचलित म्हण होती.. आता मात्र पैशा सारखा पाण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. जल है तो कल है.....! या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलेल्या
..सूचनांचे पालन करून करकंब बरोबरच करकंब च्या पंचक्रोशीत व तालुक्यात राष्ट्रीय हरित सेनेच्या वसुंधरा पर्यावरण मंडळ व स्काऊट गाईड च्या वतीने जल है तो कल है चा एक आदर्श सामाजिक संदेश दिला.