*अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्वांचा विकास करून शाळेचे नाव उज्वल करा - स पो नि निलेश तारु*

*अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्वांचा विकास करून शाळेचे नाव उज्वल करा - स पो नि निलेश तारु*

करकंब /प्रतिनिधी

- अभ्यासा बरोबर शाळेत घेत असलेल्या विविध उपक्रमात सहभागी होऊन मुलींनी व्यक्तिमत्वाचा विकास करावा व आपल्या कुटुंबाचे, शाळेचे व गावाचे नाव उज्वल करावे असे मत करकंब पोलीस स्टेशन चे स पो नि निलेश तारु यांनी व्यक्त केले करकंब येथील रामभाऊ जोशी  हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक हेमंत कदम, जि प शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय खंदारे, पर्यवेक्षक धनवंत करळे , पोलीस नाईक उमेश जाडकर , हरीत सेनेचे समन्वयक एम के  पुजारी आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना श्री तारु यांनी सोशल मिडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, ऑनलाइन शॉपिंग करताना कशा पद्धतीने दक्ष रहावे या बाबत महीती देऊन मुलींनी छेडछाड सारख्या प्रसंगात काय उपाय करावेत अशावेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर कसा करावा या बाबतही सविस्तर माहिती दिली. 
             यावेळी पोलीस नाईक उमेश जाडकर यांनीही महिलांचे सुरक्षे बाबत असणारे कायदे समजून सांगितले.
    याप्रसंगी दिवाळी सुट्टीत हरीत सेनेच्या वतीने  घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेतील विजेत्यांन सपोनि तारु यांचे हस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत कदम यांनी केले तर आभार धनवंत करळे यांनी मानले.