*करकंबच्या न्यू इंग्लिश स्कूल प्रशालेचे चित्रकला स्पर्धेत घवघवीत यश.* *दोन विद्यार्थिनींनी मारली बाजी*.

करकंब /प्रतिनिधी
:-येथील चेतना विकास मंडळ संचलित- न्यू इंग्लिश स्कूल याप्रशालेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून शिक्षा मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल करकमच्या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
परीक्षा पे चर्चा या अंतर्गत या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल या प्रशालेतील १) स्वाती अविनाश देवकते. (इयत्ता नववी),२) वैष्णवी विलास बारवे. (इयत्ता नववी), त्या चित्रांची निवड करण्यात आली. विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव मंगळवेढा पंढरपूरचे आमदार -समाधान आवताडे, गटशिक्षणाधिकारी -महारुद्र नाळे यांच्या हस्ते सिंहगड कॉलेज कोर्टी .येथे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,व रोख रक्कम देऊन करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेत संस्थेचे अध्यक्ष संजीव कुमार म्हेत्रे सर, मुख्याध्यापिका श्रीमती- करमाळकर मॅडम,पर्यवेक्षिका -शिंदे मॅडम ,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.