*इंग्रजी शाळा संघटनेच्या आंदोलनला यश.*  *लवकरच मागण्या मान्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

*इंग्रजी शाळा संघटनेच्या आंदोलनला यश.*   *लवकरच मागण्या मान्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन

   *करकंब/ प्रतिनिधी *       

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल स्ट्रस्टीज असोसिएशन (एफ ), सोलापूर व मेसा इंग्रजी शाळा संघटना औरंगाबाद यांचे विद्यमाने * मेस्टा ( एफ ) चे अध्यक्ष हरिष शिंदे , मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांचे नेतृत्वाखाली व सरचिटणीस प्रविण आव्हाळे , मेजर बंडू गडदे ,सुनिल मगर , संदीप लगामे पाटील , ज्ञानेश्वर लवंगे यांच्या उपस्थितीमध्ये उन्हाळी आधिवेशना दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे तीन मार्चपासून धरणे आंदोलन सुरू होते .या आंदोलनाची तिव्रता बघुन शिक्षक आ .विक्रम काळे , आ . अभिजित वंजारी आ .कपिल पाटील , आ .प्रविण पोटे यांनी दखल घेवून काल विधान परिषदेमध्ये इंग्रजी शाळांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून शासनाला धारेवर धरले त्यावर  *शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू* *यांनी समाधानकारक उत्तरे दिली तरीही इंग्रजी शाळा संघटनांनी आंदोलन सुरूच ठेवले होते . मंगळवार दि.नऊ मार्च रोजी सायं सहा वाजता शालेय शिक्षण मंत्री ना . वर्षाताई गायकवाड यांनी शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली व आधिवेशन काळातच लवकरात लवकर खालील मागण्या सोडविण्याचे शिष्टमंडळाला आश्वासन दिले  त्यामध्ये *1)* *आरटीईचे दिनांक 18 मे 2021 चे रू 8000/- परिपत्रक रद्द करावे. *2)*केंद्राने निर्धारीत केलेल्या दराप्रमाणे आरटीई प्रतिपूर्ती प्रतिविधार्थी दर असावा *3)*आरटीईची  रक्कम  पीएफएमएस प्रणालीद्वारे राज्य व केद्रांचा निधी सरळ शाळांच्या खाते वर्ग करावा  *4)पालकांनी वर्षा अखेर शाळांची फी भरलीच पाहीजे याबाबत शासन स्तरावरुन परित्रक निर्गमित करणे *5)*महात्मा फुले जनआरोग्य विमा योजनेचा इंग्रजी शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा आदी प्रमुख मागणीसह  12 मागण्या संघटनेतर्फे शासनास सादर  करण्यात आल्या .चर्चा समाधानकारक झाल्याने आंदोलन तूर्त मागे घेण्यात येत असल्याचे मेस्टा ( एफ ) चे अध्यक्ष हरिष शिंदे व मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदें - हस्तेकर यांनी सांगितले*.
  *हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेस्टा (एफ ) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.संतोष वलगे, श्री.हनुमंत चव्हाण , श्री. सज्जन रावडे ,श्री .अमोल सुरवसे, श्री नितीन बोगे, श्री गणेश बुरगुटे ,सागर सरगर, शरद अनंतकळवस यांनी सहकार्य केले*