*अभी... नही तो जीत... कभी नही.... म्हणत शेतकरी सभासद.. कामगारांचे श्री विठ्ठलाला साकडे......!* *आबा उर्फ अभिजीत पाटील सहानुभूतीची लाट उसळली.* *पंढरपूर तालुक्यासह राज्यात बनला अभिजीत पाटलांचा चर्चेचा विषय.*

करकंब /प्रतिनिधी
:-नुकत्याच सुरू असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार रणसंग्राम सुरू असून या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कधी नव्हे ते विक्रमी अर्ज दाखल झाले. अनेक अर्जावर हरकती आल्या. या अर्ज अनेक अवैध केले गेले. त्यातच विशेषता गेल्या काही दिवसांमध्ये श्री .विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आणि राज्यात शेतकऱ्यांना आत्मविश्वासाने एक वादळ निर्माण करणारा नेता म्हणून आबा उर्फ अभिजीत पाटील यांनी आपल्या पॅनलच्या माध्यमातून श्री विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक लढवण्याची पंढरपूर तालुक्यातील तसेच या श्री विठ्ठल सहकारी सभासद असलेल्या सभासदांशी कामगार तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची थेट संपर्क साधून त्यांच्याशी संवाद करून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये त्यांच्या अर्जावर हरकत घेतल्या कारणाने गेल्या दोन दिवसापासून पंढरपूर तालुक्यात नव्हे तर राज्यभर एक चर्चेचा विषय बनला आहे. पंढरपूर तालुक्यातील या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अनेक शेतकरी सभासद कामगार वर्ग तसेच सर्वसामान्य लोकांनी आबा उर्फ अभिजीत पाटील यांच्या अर्जावर च्या सुनावणी बाबत श्री विठ्ठलाला साकडे घातले आहे. ही घटना यापूर्वी श्री विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत कधी झाली नसल्याची भावना काही शेतकरी सभासदांनी व्यक्त केली.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीत अभिजीत पाटील उर्फ आबा यांचे काय होणार....? याची चर्चा पंढरपूर-मोहोळ विशेषता राज्यामध्ये सुरू आहे. या श्रीविठ्ठल च्या निवडणुकीत आबा उर्फ अभिजीत पाटील यांनी एक वादळ निर्माण केल्यामुळे संपूर्ण राज्याचे या श्री विठ्ठल च्या निवडणुकीकडे लक्ष वेधून लागले आहे. गेल्या काही दिवसात अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुमारे पंचवीस हजार सभासद असलेल्या तसेच कामगार वर्ग ऊस वाहतूकदार यांच्याशी तालुक्यातील गावोगावी जाऊन थेट त्यांच्याशी संवाद साधून आपल्या अभ्यास पूर्ण शैलीतून कारखाना कशा पद्धतीने पुन्हा सुरू करून या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर्मवीर माजी आमदार स्व. औदुंबर आण्णा पाटील यांच्या विचाराने आणि तत्त्वाने पुन्हा गतवैभव निर्माण करून या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना च्या शेतकरी सभासद व कामगारांना पुन्हा या तालुक्यात डिमांड निर्माण करून देण्याचे एक नवा जोश आणि आत्मविश्वास निर्माण करीत असल्याने तसेच प्रत्येक ठिकाणी लगेच भेटणारा आबा म्हणून एक वेगळी आपली सामान्यपणे ओळख करून निर्माण केल्यामुळे विरोधकांमध्ये धडकी भरल्याने काही झाले तरी श्री विठ्ठल सहकारी च्या निवडणुकीच्या रिंगणात अभिजीत पा
टील उर्फ आबा हे स्वतः आपला पॅनल लढवणार याची निश्चित खात्री आहे.
या शेतकरी सभासद व कामगार वर्गा मधून सहानुभूतीची लाट उसळली याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.