*प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी उमेश गोडसे यांची निवड*

करकंब /प्रतिनिधी :-
पंढरपूर येथील गाडगे महाराज मठामध्ये प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये नूतन तालुकाध्यक्ष. नूतन तालुका उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, प्रसिद्धीप्रमुख , तालुका पंढरपूर यांची निवड करण्यात आली. करकंब येथील उमेश गोडसे यांची पंढरपूर तालुकाध्यक्ष म्हणून निवड केल्याचे पत्र देण्यात आले .
त्याचबरोबर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याबरोबर मुंबई येथे झालेल्या बैठकीतील वृत्तांत तसेच काही महत्त्वपूर्ण सूचना सर्व प्रहार सैनिक व पदाधिकारी यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर दिव्यांग बचत गट जास्तीत जास्त स्थापन करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्याचबरोबर प्रहार अपंग क्रांतीच्या शाखा प्रत्येक गावामध्ये स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बीज भांडवल प्रकरण यासंबंधी चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी पंढरपुर विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले जिल्हा सचिव संजय जगताप, शहर प्रमुख गणेश ननवरे , नूतन तालुकाध्यक्ष उमेश गोडसे ,तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे ,महिला शहर अध्यक्षा सुनीता लावंड , महिला तालुकाध्यक्षा सरिता माने, माजी शहरप्रमुख रविराज गायकवाड ,प्रहार कार्यकर्ता राहुल नागटिळक राहुल सुतार गजानन नैवासकर ज्ञानेश्वर गायकवाड
करकंब शाखाध्यक्ष प्रहार तोफ - महेंद्र लोंढे ,,बाळू पेठकर, प्रकाश शिंदे ,दत्तात्रय धायगुडे, लाला शिंदे ,समाधान मुळे,
आदी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.