*अतिवृष्टी बाधित नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोलाची मदत* *अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या कुटुंबाशी राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांनी साधला संवाद*

पंढरपूर / प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना व घरात पाणी शिरल्याने घराची पडझड झालेल्या पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील कुटुंबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी भेट देऊन तेथील अतिवृष्टी बाधित प्रत्येक कुटुंबांना राष्ट्रवादीच्या वतीने मोलाची मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले.
यावेळी अतिवृष्टी बाधित नागरिकांशी संवाद साधताना नागेश फाटे म्हणाले की अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. याची दखल प्रशासनाने घेऊन तातडीची मदत करणे गरजेचे होते. मात्र तसे होताना दिसत नाही. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी उभी राहून सरकारला मदत करण्यास भाग पाडेल. असा विश्वास फाटे यांनी दिला.
याप्रसंगी नवनाथ बचुटे, गणेश दुरुतकर, डॉ. माणिकराव मस्के, तपकिरी शेटफळचे सरपंच महादेव मासाळ, ग्रामपंचायत सदस्य शंकर कांबळे, सत्यवान मासाळ, आरपीआय युवा अध्यक्ष अण्णासाहेब कांबळे,बिरुदेव मासाळ,दत्ता कांबळे,अरुण कांबळे,कोंडीबा मासाळ,निवास कांबळे,रुपेश कांबळे,संतोष कांबळे,सिद्राम मासाळ,हरिदास कांबळे, राजेंद्र रणदिवे, बाबासाहेब कांबळे, आनंदा कांबळे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
राज्यभरात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील शेतातील उभ्या पिकांचे तसेच घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र नुकसानग्रस्त नागरिकांना सणासुदीच्या तोंडावर तातडीची मदत देणे गरजेचे असताना याकडे शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शासनाच्या मदतीची वाट न पाहता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अतिवृष्टी बाधित नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथील अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना राष्ट्रवादीचे नेते नागेश फाटे यांनी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रत्येक कुटुंबांना देण्यात आले आहे.