*मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचे दातृत्व सुरूच*! *स्वतःच्या शेतातील मकाचे उभे पीक दिले जनावरांना वैरणीसाठी दान* *माढाचे आ.अभिजीत पाटील यांच्या साक्षीने माढा तहसीलचे केले स्वाधीन*

*मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचे दातृत्व सुरूच*!  *स्वतःच्या शेतातील मकाचे उभे पीक दिले जनावरांना वैरणीसाठी दान*  *माढाचे आ.अभिजीत पाटील यांच्या साक्षीने माढा तहसीलचे केले स्वाधीन*

पंढरपूर/प्रतिनिधी 

कोणतेही संकट असो अथवा कोणतीही मदत असो. आपल्याकडे एखादी व्यक्ती काही मागण्यासाठी आल्यास त्याला ना चा पाढा कधीच  दाखविला नाही. असे हे मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी सध्याच्या अतिवृष्टी मध्येही शासनाच्या मदतीपेक्षाही स्वतःची मदत अगोदर पोचवण्यात बाजी मारली आहे. एवढेच नव्हे तर करकम येथील स्वतःच्या शेतातील चार एकर उभ्या मकाचे पीक माढा तालुक्यातील मुक्या जनावरांसाठी दान केले आहे.


   सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या साक्षीने माढा तहसील कार्यालयाकडे आपल्या शेतातील सर्व वैरण दान केली आहे. ही वैरण माढा तालुक्यातील मुक्या जनावरांना लवकरच वाटप करण्यात येईल . असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
 यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अनिल बागल, उपजिल्हाध्यक्ष महेंद्र पवार, संजय गायकवाड इत्यादी उपस्थित होते.