*अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत द्यावी* *शिवसेना संपर्कप्रमुख भाई नितीन काळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

पंढरपूर/प्रतिनिधी
मागील अनेक दिवसापासून सलग पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके वाया गेलेली आहेत. नदीकाठी तर पुराचे पाणी शिरल्याने पिकांसह राहत्या घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. आशा वाईट काळात सरकारने लवकरात लवकर भरीव मदत देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण समितीचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाई नितीन काळे यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी. सोलापूर जिल्ह्यातील माढा ,करमाळा, मोहोळ, पंढरपूर , उत्तर सोलापूर, मंगळवेढा, बार्शी तालुक्यातील हजारो हेक्टर वरील जमिनीवरील सर्वच पिके वाहून गेली गेली आहेत. अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .मुसळधार पावसामुळे नाल्याला पुर येऊन शेतीचे आणि ओढ्यालगत असलेल्या घरांचे नुकसान झाले आहे .अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत .पावसामुळे शेतातील माती वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे .
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कार्यपद्धतीमुळे पंचनामे वेळेत होत नसून ,त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जात नाही. पंचनामे झाले तरी वास्तव नुकसानाचे योग्य मूल्यमापन होत नसल्याचे व शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संताप निर्माण झाला आहे .पाऊस सर्वत्र पडलेला असल्यामुळे नुकसानही सर्वच शेतकऱ्यांचे झाले आहे बँकांचे हप्ते कसे फेडायचे, मुलांचे शिक्षण कसे करायचे. असे अनेक प्रश्न पीडित शेतकरी करीत आहेत. त्यामुळे पिक विमा कंपन्यावर दबाव आणून शेतकऱ्यांना तातडीने विमा अदा करण्याचे आदेश द्यावेत. बँकांकडून होत असलेली वसुलीची कार्यवाही तात्काळ थांबवावी. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त बियाणे व खतांचा पुरवठा करून द्यावा. शासनाने शेतकऱ्यांचा त्वरित पंचनामा करून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. केवळ पीक नुकसान नव्हे तर जनावरांचे घरांचे व गोट्यांचे नुकसान झाले आहे यासाठी वेगळी आर्थिक मदत जाहीर करावी.
सरकार संवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणारे मंत्री आहेत. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना न्याय मिळेल जे अधिकारी काम चुकारपणा करतात त्यांना पाठीशी घालणार नाही. शेतकऱ्यांना आपल्या सरकारकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे .माझ्या मागणीचा विचार करून आपण नक्कीच न्याय द्याल अशी आशा करतो. असे काळे यांनी सांगितले.