*दीडशे जणांचे प्राण वाचवणाऱ्या मासेमारांचे शिवसेनेकडून सत्कार*  *प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीचे  किराणा सामान भेट*

*दीडशे जणांचे प्राण वाचवणाऱ्या मासेमारांचे शिवसेनेकडून सत्कार*   *प्रत्येकी तीन हजार रुपये किमतीचे  किराणा सामान भेट*

 पंढरपूर /प्रतिनिधी 

 सीना सीना नदीला महापूर आल्यानंतर आपल्या होळीच्या साह्याने पाण्यात अडकलेल्या दीडशे नागरिकांना रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन करून जीवदान देणाऱ्या मासेमारी करणाऱ्या भोई समाजातील सात तरुणांचा करमाळा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते  आज सत्कार करण्यात आला
 साहेबराव भोई साहेबराव भोई भारत भोई चंद्रकांत भोई सुरेश भोई गोकुळ भोई राम बळीराम भोई यांचा जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या हस्ते फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांच्या संस्थेमार्फत प्रत्येकी तीन हजार रुपये किराणा समिती असलेले किट भेट देण्यात आले .   यावेळी बोलताना श्याम भोई  म्हणाले की 
 आम्ही रात्रभर पाण्यात उतरून दीडशे लोकांचे प्राण वाचवले आमच्या स्वतःच्या बोटीचे मासे पकडण्याचे जाळे व इतर साहित्याचे लाख रुपये नुकसान झाले 
 तरी आमच्या जीवाची व नुकसानीची परवा न करता दीडशे जणांना आम्ही बाहेर काढले याला सर्व प्रशासन साक्षीदार आहे पोलीस साक्षीदार आहेत पण मात्र कुणीही आमच्या अभिनंदन केले नाही सत्कार केला नाही किंवा कोण आम्हाला मदत घेऊन आली नाही 
 मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आमच्या सर्वांचा हार फेटा घालून सत्कार केला याचा आम्हाला अभिमान आहे 
 त्याबरोबरच आम्हाला किराणा साहित्य देऊन सर्व घरे स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले आहे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दाखवलेली संवेदनशीलता हा सुद्धा आमचा सत्कारच आहे असे मी समजतो