*वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वन्य प्राण्यांसाठी चारा- पाण्याची सोय....!* *अजय कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सामाजिक उपक्रम.* *सर्वच थरातून होतेय कौतुक*.

करकंब/ प्रतिनिधी
:- येथील बार्डी (ता. पंढरपूर) वन विभागातील असलेल्या जंगलामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे वन्य प्राण्यांची चारा -पाण्याविना उपासमारी होत असल्यामुळे नरसिंह प्रतिष्ठान ,नरसिंह नगर टेंभुर्णी .यांच्याकडून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी या सामाजिक बांधिलकी म्हणून मुक्या प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्था करण्यासाठी लोकांनी पुढे येण्याबाबत नरसिंह प्रतिष्ठानने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आज अजय भैय्या कांबळे, अध्यक्ष अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज टेंभुर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या असलेला अनावश्यक खर्च टाळून करकंब येथून दोन गुंठे हिरवे मकवान( गवत )विकत घेऊन ते बापू जाधव, करकंब यांच्या वाहनातून बार्डी येथील वन विभागातील या वन्य प्राण्यांसाठी,जनावरांसाठी टाकण्यात आले. त्यांच्या या उपक्रमामुळे बार्डी करकमसह परिसरातून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.करकब येथील प्रमोद नलवडे, नवनाथ नलवडे यांच्या मदतीने प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यापुढे देखील उन्हाळ्याचे दिवस संपेपर्यंत वन प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे अजय कांबळे यांनी सांगितले.
यावेळी गणेश शिंदे, अजय कांबळे, प्रमोद नलवडे, पृथ्वीराज शिंदे, प्रणव थोरात, अथर्व शिंदे, नवनाथ नलवडे, प्रशांत खारे असे उपस्थित होते.