*खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ऊस दरातही आघाडी* *स्वराज कारखान्याने दिला उच्चांकी दर* *प्रति टन ३१०१रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा*

*खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ऊस दरातही आघाडी*   *स्वराज कारखान्याने दिला उच्चांकी दर*  *प्रति टन ३१०१रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा*

पंढरपूर/प्रतिनीधी 

स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना उपळवे, ता. फलटण, जि. सातारा या साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर दिलेला आहे. गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन 3101 रुपयांचा रक्कम वर्ग केलेले आहेत. त्यामूळे शेतकरी वर्गामधून समाधानाचे वातावरण व्यक्त केले जात आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज साखर कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेल्या रकमेमध्ये उच्चांकी दरदिल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 खा. निंबाळकर यांनी आपल्या खासदारकीचा उपयोग हा या मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केला आहे. महायुतीतून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आगृह असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजप श्रेष्ठीनाही याच नावाचा विचार करावा लागणार आहे. हे मात्र नक्की.