*स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्तृत्वला दिली साथ* *चेअरमन अभिजीत पाटील यांचे बेरजेचे राजकारण सुरूच* *विठ्ठलच्या निवडणुकीत मोठी चुरस वाढली*

पंढरपूर/ प्रतिनिधी
श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणूकीत दिवसेंदिवस रंगत वाढताना दिसत आहे. अशातच मा.खा.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विठ्ठलच्या निवडणूकीसाठी अभिजीत पाटील यांच्याकडे असलेले कर्तृत्व पाहून त्याच गटाकडे युतीसाठी हात पुढे केला आहे.त्यामुळे प्रचारातील चुरस आणखी वाढली आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व पुन्हा कारखाना सुरळीत चालावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अभिजीत पाटील यांच्या गटासोबत युतीसाठी हात पुढे केला आहे. विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ हे सत्तेत असताना गेल्या दहा वर्षाच्या काळात सभासद शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.तसेच दोन हंगाम कारखाना बंद राहिल्याने अनेक सभासद शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल अभिजीत पाटील यांची भेट घेऊन युतीसाठी हात पुढे केला आहे.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,विष्णु बागल, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे,विधी जिल्हाध्यक्ष ॲड.विजयकुमार नागटीळक, युवा जिल्हा कार्याध्यक्ष मनोज गावंधरे,तालुका अध्यक्ष सचिन पाटील,साहेबराव नागणे,सचिन अ
आटकळे,रणजीत बागल,नाना चव्हाण,सोमनाथ घोगरे,कांताभाऊ नाईकनवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
"विठ्ठलच्या सभासद शेतकऱ्याला योग्य न्याय मिळावा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.आमची संघटना शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे.ज्या लोकांनी विठ्ठल वर कर्जाचा डोंगर उभा केला आणि स्वतः मात्र स्वार्थ साधून घेतला त्यांना आमचा विरोध आहे.भगीरथ भालके व युवराज पाटील दोघेही सत्तेत असताना कारखाना अधोगतीला गेला आहे.कारखाना पुन्हा चालू झाला पाहिजे व तो चांगल्या प्रकारे चालला पाहिजे .अभिजीत पाटील चांगल्या प्रकारे कारखाना चालवू शकतात ही खात्री आहे.यामुळे आम्ही अभिजीत पाटील यांच्यासोबत युती करत आहोत."
सचिन पाटील
पंढरपूर तालुका अध्यक्ष
स्वाभिमानी शेतकरी संघटना