*एस.पी.स्कूलला सर्वोतपरी मदत करू - आ.बबनदादा शिंदे* - *नांदोरे येथे एस.पी.ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स, पायल स्कॉलर व फाउंडेशन अकॅडमीचे उदघाटन संपन्न*

*एस.पी.स्कूलला सर्वोतपरी मदत करू - आ.बबनदादा शिंदे* - *नांदोरे येथे एस.पी.ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स, पायल स्कॉलर व फाउंडेशन अकॅडमीचे उदघाटन संपन्न*


करकंब(प्रतिनिधी) :-
    ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणाऱ्या एस.पी.स्कूल,नांदोरे या शिक्षण संस्थेने सुरुवातीला छोटेसे रोपटे लावले होते त्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले असून सध्या या संस्थेत सातशे मुले शिक्षण घेत आहेत.त्यामुळे दर्जेदार शिक्षण देणारी ही ग्रामीण भागातील उत्तम संस्था असून यापुढे संस्थेस सर्वोतपरी मदत करणार असल्याचे यावेळी आ.शिंदे यांनी सांगितले.    
    नांदोरे ता.पंढरपूर येथील  एस.पी.ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स व पायल स्कॉलर व फाउंडेशन अकॅडमीचे उदघाटन आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर महानगर पालिका कोऑरडिनेटर सुधीर खरटमल,प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य आबासाहेब देशमुख हे होते. यावेळी करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि निलेश तारू, मेस्टाचे राज्यसचिव गणेश नीळ, विठ्ठलराव शिंदे सह. चे संचालक पोपट चव्हाण, जि.प. सदस्य प्रतिनिधी बंडूनाना ढवळे, मा. सहा.आयुक्त पशुसंवर्धन डॉ.नंदुकुमार होनराव, सत्यवान करांडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, खजिनदार विक्रम भिंगारे ,तज्ञ संचालक युवराज सातुरे ,प्रकल्प संचालिका वासंती वलगे, मुख्याध्यापिका स्वाती चव्हाण उपस्थित होते.
    यावेळी बोलताना आ.शिंदे यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संतोष वलगे हे शैक्षणिक बांधिलकी जपत असताना सामाजिक  बांधिलकी ही जपत आहेत.त्यांनी कोरोना काळात पालकांचे छत्र हरपलेल्या पाल्यांना आर्थिक मदत देऊ केली आहे तसेच मी सुद्धा माढेश्वरी बँकेच्या माध्यमातून अशा पाल्यांना प्रत्येकी दहा हजार रु. मदत देणार असल्याचे सांगितले.
    यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये सुधीर खरटमल यांनी नांदोरे सारख्या ग्रामीण भागामध्ये अतिशय दर्जेदार शिक्षण देणारी संस्था असल्याबदद्ल तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील उच्च शिक्षणाचा विचार करून जेईई, नीट, सीईटी फाउंडेशन अकॅडमी सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी आबासाहेब देशमुख, निलेश तारू यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी तांबवेचे सरपंच विजय खटके, अॅड. संभाजी पिंगळे, प्रा. भगवान वाजे, पोपट भाऊ खापरे, दयानंद पाटील, आण्णासाहेब कोरके, संस्थापक हणुमंत चव्हाण, गणेश बुरकुटे, नारायण भानवसे, महेंद्र वाकसे, हरिश्चंद्र गाडेकर , संजय मोहिते, अशोक काटकर यांच्यासह ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठया संस्थेने उपस्थित होते.
 
पुरस्काराने सन्मानित :-
अप्पासाहेब जाधव,कोल्हापूर - पायल सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार,माधव भिंगारे,नांदोरे - पायल जीवन गौरव पुरस्कार,शिवजीत व्यवहारे,नेवरे - पायल कृषिरत्न पुरस्कार, संगीता बाड, श्रीपूर - पायल हिरकणी पुरस्कार,गोपीनाथ देशमुख,करकंब - पायल आदर्श पत्रकारीता पुरस्कार,दीपक माने,नेमतवाडी - पायल क्रीडारत्न पुरस्कार,प्रशांत बोबडे,नेवरे - पायल आदर्श पालक पुरस्कार, पायल सर्वोत्कृष्ट विद्यार्थी -करण दत्तात्रय उपासे, पायल सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी _ ऋतुजा विलास वाघ, पायल आदर्श विद्यार्थिनी -सानिका अनिल तांडले.