*करकंब करानों सावधान ¡¡¡¡¡* *अकरा संजीवन समाध्या पाहत आहेत गावाच! भावाच!! अन देवाच खाऊ नका *

करकंब/ प्रतिनिधी
करकंब हे गाव पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिध्द असले तरी ते करकंब हे अकरा संजीवन समाधी असणारे गाव म्हणून ओळखले जाते.
करकंब मध्ये कोणी एखाद्या गोष्टीचाअतिरेक करत असेल तर त्यास असे करू नको अकरा जिवंत समाध्या पाहत आहेत असे सहज सांगितले जाते.
हे सहज सांगितले जात असले तरी करकंब गावचा इतिहास पहिला तर हे अगदी खरे वाटते. करकंब मध्ये आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला मग तो पैशांचा असो,सत्तेचा असो, संघटनेचा असो, पदाचा असो की अधिकाराचा कोणत्याही गोष्टीचा गैरवापर, दुरुपयोग केल्यास माज केल्यास त्या व्यक्तीवर अकरा जिवंत समाध्याची दृष्टी असते व त्यास येथेच त्याची फेड करावी लागते असा विश्वास व श्रद्धा करकंबकरांना आहे.
गावाच ! भावाच !! अन देवाच खाल्ल्याने गावात फेड नक्की यावर करकंब करांचा खूप विश्वास आहे.
यापूर्वी ज्यांनी संघटनेचा जोरावर, पदाच्या, देवस्थानच्या , राजकीय सत्तेच्या, नोकरीच्या, किंवा व्यवसायाच्या माध्यमातून खूप खाल्ले, अतिरेक केला , माज केला त्यांची अवस्था अत्यंत वाईट झालेली उदाहरणे लोकानी डोळ्याने पाहिली आहेत व सध्याही पाहत आहेत. कायदा कोणाला शिक्षा देवो अथवा न देवो पण संजीवन समाध्या अशा व्यक्तीचा हिशोब नक्की करतात त्यातून सुट्का नाही यावर येथील लोकांचा गाढ विश्वास आहे.
त्यामूळे गावात व्यवसाय करीत असताना, निधीचा वापर करीत असताना, नोकरी करीत असताना ,सामजिक काम करीत असताना असे समजू नका की कोणाचे लक्ष नाही
या संजीवन समाध्या तुमच्यावर लक्ष ठेउन आहेत हे नक्की
त्यामूळे करकंब मध्ये
गावाच! भावाच !! अन देवाच खाऊ नका अशी चर्चा सुज्ञ नागरिक , भाविका मधून होत आहे.