*पंढरपूर मध्ये विश्वकर्मा जयंती साजरी*

पंढरपूर /प्रतिनिधी
17 सप्टेंबर 2025 रोजी पंढरपूर मध्ये प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या जयंतीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विश्वकर्मा सद् भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भजनी मंडळ वारकरी मंडळातील मुले पारंपरिक वाद्य तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीची सांगता दिगंबर महाराज मठ या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक सुभाष मस्के सर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हनुमंतराव पांचाळ होते सुभाष मस्के सर यांनी बोलत असताना प्रभू विश्वकर्मा जयंतीचे महत्त्व सांगून विश्वकर्माचे वंशज यांना एकत्र येण्याच्या आव्हान केले तसेच सुतार समाजातील समाज बांधवांना अडचणीचे वेळी मदत करण्याचे आश्वासन दिले पुढे बोलताना म्हणाले परिचारक घराण्याने मोठ्या मालकापासून अगदी प्रशांत मालकापर्यंत सर्वांनी च कायमच सुतार समाजावर प्रेम केले मायक्रो असणारा समाज याची ओळख करून दिली .
अध्यक्षीय भाषणामध्ये हनुमंतराव पांचाळ यांनी सर्व समाज बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजना आदरणीय परिचारक मालकांच्या सहकार्याने सोडवण्याचे आवाहन केले तसेच पंढरपूर मधील संत जळोजी मळोजी महाराज यांच्या जीर्णोद्धार साठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे आव्हान केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब सुतार (सर )मधुकर सुतार चंद्रकांत सुतार भारत काळे नागनाथ सुतार विश्वंभर डोळस सखाराम डोरले मधुकर आढळकर अर्जुन सुतार नितीन सुतार रावसाहेब रोकडे राजेश महामुनी विजय सुतार वसंत क्षीरसागर .गणेश आपरे सुहास लोहार आदींनी विशेष परिश्रम घेतले तसेच विश्वकर्मीय वंशज म्हणून सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
'सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मधुकर सुतार यांनी तर आभार तुकाराम सुतार यांनी मानले शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .