*मोहोळ मतदार संघातील मोफत पाणीसेवेची सांगता* *उद्योजक राजू खरेंनी केला होता ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा* *तब्बल ७० दिवस १४ टँकरचे माध्यमातून सुरू होते पाणीवाटप*

*मोहोळ मतदार संघातील मोफत पाणीसेवेची सांगता*
*उद्योजक राजू खरेंनी केला होता ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा*
*तब्बल ७० दिवस १४ टँकरचे माध्यमातून सुरू होते पाणीवाटप
पंढरपूर /प्रतिनिधी
आज दुष्काळात पाणी विकून पैसे कमावणाऱ्यांचे उदंड पीक आलेले असताना मोहोळ तालुक्यात वाड्या वस्त्यावरील नागरिकांचे पिण्याचे पाण्यासाठी सुरू असणारी भटकंती लक्षात घेत उद्योजक राजाभाऊ खरे या जलदुताने मोफत पाणीसेवा उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. तब्बल ७० दिवसापासून चौदा टँकरच्या माध्यमातून उद्योजक राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील वाड्या वस्त्यावरील सर्वसामान्य जनतेला मोफत पाणीपुरवठा केला. मागील चार दिवसापासून वरूण राजाच्या कृपेने पावसाने या भागात दमदार हजेरी दिल्याने या परिसरात बोरवेल तसेच पिण्याच्या पाण्याचा साठा झाल्याने आज दिनांक 13 जून रोजी हा उपक्रम बंद केला.
यावेळी तालुक्यातील बहुसंख्य महिला भगिनींनी दिवसरात्र पाणीपुरवठा करणाऱ्या या टँकरचे चालक वाहक यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या. स्वखर्चातून जनतेची तहान भागविणार्या जलदूत जलदुत खरे यांच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करीत जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले.
*नारळ फुटला आणि कंठ दाटला *!
यंदा कडक उन्हाळा होता, मोहोळ तालुक्यातील अनेक गावं तहानली होती. घशाची कोरड घेऊन लोक आशेने प्रशासनाकडे पहात होती. कुणीही पुढं आलं नाही. लोकांच्या अशा संकटात राजू खरे नावाचा, माणूस पुढे आला आणि त्याने आपल्या खिशाला झळ लावत, एक दोन नाही तर तब्बल १४ टँकर दिले... हे टँकर पाणी घेवून लोकांच्या दारात जाऊ लागले, एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला होता तर दुसरीकडे, कृतज्ञतेचे पाणी लोकांच्या डोळ्यातून वाहू लागले होते, उन्हाळा संपेपर्यंत हे टँकर लोकांची तहान भागवत राहिले, आता पाउस झाला. मनमोकळेपणाने बरसला ,विहिरीला पाणी आलं, आटलेल्या बोअर सुरु झाल्या,लोकांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं,आता टँकरच्या पाण्याची कुणालाच गरज नाही, त्यामुळे राजू खरे यांनी हे टँकर परत बोलावून घेतले. लोक म्हणू लागले, खरा पाणीदार माणूस कसा असावा ? तर तो राजू खरे सारखा. मोहोळच्या चंद्रमौळी गणेश मंदिरात या उपक्रमाची सांगता झाली, जनतेची तहान भागविणाऱ्या टँकर चालकांचा सन्मान, राजू खरे यांचे बंधू विजू खरे आणि परिवाराच्य वतीने सर्व वाहन चालक यांना मानाचा श्रीफळ,मायेची शाल पांघरून सत्कार करण्यात आला,लोक फक्त पहात होते,त्यांना खूप काही बोलायचं होतं पण शब्द मुके झाले होते.गणपतीला नारळ फोडण्यात आला आणि नारळाच्या पाण्यासोबत, लोकांच्या डोळ्यातही पाणी आले, डोळ्यातला एक एक थेंब, राजू खरे यांची कृतज्ञता व्यक्त करीत रहिला. यावेळी मोहोळ नगरपरिषदेचे नगरसेवक सिकंदर बोंगे,चंद्रकांत गोडसे,अण्णा गवळी,महादेव गोडसे,सुमित पवार,गणेश क्षीरसागर,विठू देशमुख,अमृत सातपुते, सरफराज सय्यद,दादाराव क्षीरसागर,संतोष नरोटे, नजीकपिंपरी गावचे सरपंच अरुण कदम,सेवालाल नगरचे सरपंच लक्ष्मण राठोड, हरळवाडी गावचे सरपंच लिंगराज व्होनमने, रामहींगणीचे सरपंच संभाजी लेंगरे,बेगमपूर गावचे सरपंच प्रकाश सपाटे, नेपतगावचे माजी सरपंच पांडुरंग परकाळे, बीबीदारफळ गावचे उपसरपंच नारायण सर्वगोड, ग्रामपंचायत सदस्य विजय साठे, समाधान चौरे,शैलेश चौरे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष जाधव
,उत्तर सोलापूर शिवसेना तालुका प्रमुख उमाकांत करंडे, उत्तरसोलापूर युवा शिवसेना तालुका प्रमुख आकाश गजघाटे, शिवसेना उपप्रमुख बजरंग देवकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे व खवणी गावचे तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम भोसले, नान्नज गावचे शिवसेना उपप्रमुख नंदकुमार गवळी, दादा गोरे,आरपीआय जिल्हा युवक अध्यक्ष तात्यासाहेब काळे, किशोर बनसोडे, जावेदजी बोंगे, संतोष बनसोडे, गणेश जाधव, नागनाथ बंडगर, प्रकाश चव्हाण, संदीप घाडगे, दिनेश गुरव, भीम टायगरचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष लखन घाटे, विक्रम तीर्थे, उत्कर्ष मस्के, गणेश क्षीरसागर,बिट्टू देशमुख,अमृत सातपुते, दादाराव क्षीरसागर, संतोष नरोटे, सुनील पाटील, दादा गोरे, पांडुरंग तात्या डोंगरे, अधिक कार्यकर्ते व विविध मान्यवर उपस्थित होते.