*पांडुरंग परिवाराचे बडे नेते वसंतराव देशमुख शांतच* *भाजपचे उमेदवार आ. सातपुते यांचेसाठी मोठा धक्का*!

*पांडुरंग परिवाराचे बडे नेते वसंतराव देशमुख शांतच*  *भाजपचे उमेदवार आ. सातपुते यांचेसाठी मोठा धक्का*!

पंढरपूर/प्रतिनीधी

सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीकडून विरोधातील नेते मंडळींना आपलेसे करत आपल्या बाजूला घेण्यासाठी वाटेल ते करण्याचा खटाटोप चालविला आहे. पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवारातील बडे नेते वसंतराव देशमुख मात्र कुठेही प्रचारात सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत नाही. त्यामुळे आ. सातपुते यांचेसाठी हा फारच मोठा धक्का आहे.
    पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात कासेगाव गट , आणि पंढरपूर शहरातील, यासह मंगळवेढा तालुक्यातील काही भागात वसंतराव देशमुख हे महत्वाच्या स्थानी असतात. त्यांची राजकीय कारकीर्द फार मोठी आहे. त्यांनी आजवर पंचायत समिती सभापती, मार्केट कमिटी सभापती, पांडुरंग सह साखर कारखाना व्हा.चेअरमन, कायम संचालक, जिल्हा परिषद सदस्य यासह अनेक पदे उपभोगली आहेत. त्यांचे पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ राजकीय वजन आहे. त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हा विषय चर्चेचा बनला आहे.
  वसंतराव देशमुख हे परिचारक आणि मोहिते पाटील असे दोन्ही नेत्याचे समर्थक म्हणून आजवर काम करीत आहेत.या लोकसभा निवडणुकीत अद्याप त्यांची भूमिका शांत असल्याचे जाणवत आहे.
    पंढरपूर तालुक्यातील 22गावातून सर्वात मोठी मतदार संख्या असलेल्या कासेगाव मधून मोठा दबदबा तर आहेच. परंतु बाकी इतर गावातून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यामुळे वसंतराव देशमुख यांची शांतता भाजपला धोका निर्माण करणारी ठरत आहे.