*करोळे येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मारहाण:* *परस्परांवर गुन्हा दाखल*

करकंब  :प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे मागे घडलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन झालेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला असून काही लोक किरकोळ जखमी झाले असल्याची फिर्याद पिन्टू उत्तम साठे यांनी करकंब पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे.तर दुसरी फिर्याद कुंडलिक साठे यांनी दिली आहे. 
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,करोळे येथे फिर्यादी पिन्टू साठे हे समाज मंदीरा समोर उभे असताना आरोपी युवराज साठे यास आपण महालुंंग येथे जाऊन नाना जाधव याचे कडून माझी मोटारसायकल घेऊन येऊ तु या व्यवहारात मध्यस्थी आहेस तु आले पाहिजे असे म्हणल्या नंतर आरोपी याने मी येत नाही असे म्हणून भांडण करण्यास सुरवात केली व फिर्यादीस व सदर ठिकाणी असणारे अतुल रामचंद्र साठे व इतरास कोयता,काठी,लाकडी काठी अदिने मारहाण केली असल्याची फिर्याद दाखल केली असून आरोपी कुंडलिक साठे, रामचंद्र साठे,तानाजी साठे,राजू साठे,पांडूरंग साठे,सोमनाथ साठे, दया साठे, अजित साठे,किरण साठे, भीमराव पाटोळे, रामहरी पाटोळे, शांताबाई साठे,पिन्टी साठे, राहिबाई साठे, चेतन साठे, अनिता साठे , उमाबाई साठे, युवराज साठे आदींवर भा द वी 307,324, 504, 506, 143, 147, 148, 149 सह 4 ,35 व 27  अन्वये गुन्हा दाखल झाला आहे 
पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक  महेश मुंढे  हे करीत आहेत
  तर दुसरी फिर्याद कुंडलिक साठे यांनी दिली असून या फिर्यादीत मागील भांडणाचा राग धरुन आरोपी सुनील साठे, अनिल साठे,अतुल साठे, समाधान साठे, उमाजी साठे, पिन्टु साठे, रावसाहेब साठे, रामा साठे , राजेंद्र साठे, शहाजी साठे, नितीन साठे, युवराज साठे, मंगल साठे, कासाबाई साठे, ललिता साठे, उज्वला साठे, आशाबाई साठे, शकुंतला साठे, सविता साठे, रमेश साठे, बायडाबाई साठे,  रोहित साठे,विलास साठे यांनी कोयता , काठी व दगड यांनी मारहाण करून कुंडलिक साठे, रामचंद्र साठे,किरण साठे, जगाबाई पाटोळे , अंबीका साठे यांना जखमी केले असल्याने त्यांचेवर भा द वी 307,324, 504, 506, 143, 147, 148, 149 सह 4 ,35 व 27  अन्वये गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे हे करीत आहेत