*जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळातर्फे 800 विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप.*

.
करकंब /प्रतिनिधी
श्री. हनुमान जन्मोत्सव निमित्त आज शनिवार रोजी दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळ व समस्त वडार समाज बांधव करकंब, ता. पंढरपूर यांच्या वतीने रामभाऊ जोशी हायस्कूल मधील इयत्ता पाचवी ते नववी च्या 650 विद्यार्थ्यांना व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले क्रमांक एक , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली क्रमांक दोन व अंगणवाडीतील एकूण 150 विद्यार्थी, असे एकूण 800 विद्यार्थ्यांना हनुमान जन्मोत्सव निमित्त प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी रामभाऊ जोशी हायस्कूलचे एम के पुजारी सर यांनी जय बजरंग उत्कर्ष तरुण मंडळ व समस्त वडार समाज बांधव करकंब, च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले,
सदर प्रसाद वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य -संतोष (भाऊ) धोत्रे, माजी सदस्य- सुनील मोहिते, संजय मोहिते, संजय धोत्रे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष - महेंद्र पवार, सुनील धोत्रे, महेंद्र पेठकर, केरबा पवार, महेश ब्रदर, उत्सव समितीचे अध्यक्ष शशी( भाऊ) चौगुले , ज्येष्ठ शिक्षक दत्तात्रेय खंदारे सर, मुख्याध्यापक- हेमंत कदम, पर्यवेक्षक - धनवंत करळे सर व रामभाऊ जोशी हायस्कूल चा संपूर्ण स्टाफ व जिल्हा परिषद शिक्षक उपस्थितीत होते.