*उद्योजक राजाभाऊ खरे यांचे गोपाळपूर येथील फार्महाऊस हाऊसफुल्ल* *देवडीचे सरपंच उद्योजक राजाभाऊ खरे यांच्या गटात प्रवेश*

पंढरपूर /प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आहे. आगामी विधानसभेच्या दृष्टीने मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. अशातच उद्योजक राजाभाऊ खरे यांचे नाव अवघ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात घराघरात पोहोचले आहे. यामुळे खरे यांचा गट प्रबळ होत असल्याचे दिसत आहे.
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघातून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे जाहीर केल्यामुळे पंढरपूरचे सुपुत्र राजाभाऊ खरे यांच्या गोपाळपूर येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत असल्याचे चित्र मागील अनेक महिन्यापासून दिसून येत आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून राजाभाऊ खरे यांनी प्राधान्य दिले होते. याची प्रचिती म्हणून अनेक गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच राजाभाऊ खरे यांच्याशी सलगी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
मोहोळ मतदार संघातील विविध गावातून, कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी गोपाळपूर येथील फार्महाऊस वर येऊन आपल्या भागातील समस्या सोडवून घेतल्या जात आहेत. सरकारी निधीतून विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असतानाच, पदरमोड करूनही राजाभाऊ खरे यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामुळे अनेकांनी पाठिंबा व्यक्त करीत, राजाभाऊ खरे यांच्या गटात सामील झाल्याचे जाहीर केले आहे.
अशातच देवडी गावचे विद्यमान सरपंच सागर थोरात यांचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या गटात प्रवेश केला आहे.