*मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी कुटुंबासह पंढरपूर येथे बजावला मतदानाचा हक्क* *धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय होणार* *दिलीप धोत्रे यांनी केला विजयाचा दावा* 

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे लोकशाहीतील पवित्र असा मतदानाचा हक्क बजावला. 

याप्रसंगी माध्यमांशी बोलताना दिलीप धोत्रे यांनी ही निवडणूक जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. 
ते पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विद्यमान लोकप्रतिनिधींनी कोणतीही विकास कामे केली नाहीत. मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. युवक बेरोजगार आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी लघुउद्योग उभारले नाहीत. तरी देखील धनशक्तीच्या जोरावर मतदारांना आम्हीच दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी केला आहे.