*वृषाली कुलकर्णी यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान*
पंढरपूर /प्रतिनिधी
अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त
नवनित प्राथमिक विद्यालय,पंढरपूर येथे कार्यरत असलेल्या सौ. वृषाली प्रवीण कुलकर्णी यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हा पुरस्कार अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त दीपक आर्वी, सचिन वायकुळे, प्रमोद तमन्नावार, जब्बार शिकलगार यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सौ. वृषाली प्रवीण कुलकर्णी , यांच्या शिक्षण क्षेत्रातीला २० वर्षाच्या योगदानामुळे व शिकवन्याच्या पद्धतींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शैक्षणिक यश मिळवले असून, त्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरल्या आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक प्रगतीसह संस्कार व मूल्य रुजवणे हे देखील उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यांच्या शांत, संयमी आणि मेहनती स्वभावामुळे व संघर्षमय प्रवासामुळे त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नवनीत प्राथमिक विद्यालय, पंढरपूर येथे मुख्याध्यापक धांडोरे सर, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अधिक जोमाने योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. हा गौरव फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरतो असे मत त्यांनी व्यक्त केले .