*राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई*  *1 कोटी 24 लाख 71 हजार  रुपयांचा मुददेमाल जप्त*

*राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची गोवा बनावटीच्या विदेशी मद्य वाहतूकीवर धडक कारवाई*    *1 कोटी 24 लाख 71 हजार  रुपयांचा मुददेमाल जप्त*

       पंढरपूर/प्रतिनिधी 

-   राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या   माळशिरस  विभागाने रविवार दि. 12 जुलै  रोजी दुपारी मौजे मळोली ता. माळशिरस  येथे सापळा रचुन गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य वाहतूकीवर कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून 1 कोटी 24 लाख 71 हजार  रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
         सदर ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत गोवा राज्य निर्मीत व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेले विदेशी मद्याचे 750 मिली क्षमतेच्या 8 हजार 400 बाटल्या (700 बॉक्स) एकून रक्कम  92 लाख 40  व एक चौदा टायर ट्रक अंदाजे किंमत 32 लाख रुपये  व तीन मोबाईल अंदाजे किंमत 31 हजार असा एकून 1 कोटी 24 लाख 71 हजार  रुपयांचा मुददेमाल जप्त करुन महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये दोन इसमांवरती गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
                   सदर कारवाई निरीक्षक सचिन भवड, राकेश पवार दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले, बाळासाहेब नेवसे, अमित नांगरे, अक्षय सस्ते, स्वप्नील सोनवलकर, प्रितम पडवळ, सहा.दु.निरी. एस.ए.बिराजदार, जवान योगेश पाटील, प्रविण पुसावळे, देवीदास चौधरी, संजय पराडे, रेवनसिद्ध कांबळे, योगीराज तोग्गी, युवराज टेळे, आबासो कसबे, सचिन भोसले, किरण गोळे, रोहित लोखंडे, सुजित जाधव, दिवेश फडतरे, सौरभ गुरव, ओंकार जाधव, महिला जवान कल्पना जाधव जवान नि. वाहन चालक मारुती जडगे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. सौरभ भोसले दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.
               जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारुची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी.तसेच टोल फ्री क्र.१८००८३३३३३३व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती भाग्यश्री  जाधव यांनी केले आहे.