*करकबच्या राजकारणात देशमुख बंधुतील कटुता वाढली!* *सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांची पंढरपूर पं.स चे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली तक्रार* *करकम्बच्या जि. प सदस्य पतीच्या हस्तक्षेपामुळे गावचा विकास थांबला असल्याचाच केला तक्रारीत आरोप*
करकंब /प्रतिनिधी
करकंब आणि करकंब येथील देशमुख बंधू यांच्यातील एकमेकातील वादाचा विस्तवही अजूनही विजत नसल्याने या वादाची ठिणगी आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या दारात येऊन ठेपली आहे. त्यामुळे या वादाची ठिणगी आता आगीचे रूप धारण करणार का याकडे करकब करांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र सोलापूर जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे महिला व बालकल्याण च्या माजी सभापती व जि प सदस्य रजनी देशमुख यांचे पती माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख हे नेहमी व सतत पंचायत समितीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करीत आहेत. करकम जिल्हा परिषद गटाच्या सदस्य रजनी देशमुख यांचे पती बाळासाहेब देशमुख हे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरून मनमानी पद्धतीने कामकाज करण्यासाठी दबाव टाकत आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयात बसून हे पती महाशय विनाकारण सामान्य नागरिक व पदाधिकाऱ्यांना त्रास करीत आहेत

.
या माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या पंचायत समितीच्या सततच्या हस्तक्षेपामुळे करकब चा विकास खुंटला आहे . वारंवार पंचायत समितीत बसून अधिकारी व सामान्य नागरिकांना वेठीस धरून करकब चा काय विकास करणार ? य उलट विकासाच्या ऐवजी तक्रारी आणि वेठीस धरून स्वतःच्या मर्जीप्रमाणे कारभार करून खऱ्या अर्थाने करकंब च्या विकासाला या पती महाशयांनी अडथळा निर्माण केला असल्याचा थेट आरोप केला आहे.
यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य ऍड शरदचंद्र पांढरे, महेंद्र शिंदे, संजय धोत्रे आदी उपस्थित होते.