पंढरीचे सामाजिक कार्यकर्ते यांचेडून मुंबईत रक्तदान* *मुख्यमंत्री ना.फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाई नितीन काळे यांची रक्तदान*
पंढरपूर/प्रतिनिधी
पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाई नितीन काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना .देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले.

महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय, नरिमन पॉईंट, मुंबई येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.. या पवित्र व सामाजिक कार्यात सहभागी होऊन भाई नितीन काळे यांनी रक्तदान केले.
या शिबिरात सहभाग घेतल्याने राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , आणि राज्याचे आदिवासी मंत्री मा. अशोक उईके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. हे स्वीकारतानाचा हा क्षण अत्यंत अभिमानास्पद वाटला असल्याची प्रतिक्रिया भाई नितीन काळे यांनी व्यक्त करीत मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.