*वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा*

*वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा*

पंढरपूर/प्रतिनिधी 

वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, वाडीकुरोली येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजय कुलकर्णी सर व प्रमुख पाहुणे कुमार गाजरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक हागवणे सर, पांढरे सर, सरडे सर, हाडमोडे सर, गावडे सर, जमदाडे सर, लोखंडे सर, जोगी मॅडम, नवले मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्व शिक्षकांना पेन व गुलाबपुष्प देऊन गुरुदक्षिणा देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमात हाडमोडे सर यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात नम्रता बाळगावी व चुकीतून शिकले पाहिजे असे सांगितले, तर जमदाडे सर यांनी अंधारातून प्रकाशाकडे कसे जायचे याबाबत मार्गदर्शन केले. सरडे सर यांनी कुंभार जसा मडके घडवतो त्याचप्रमाणे शिक्षक विद्यार्थ्याला घडवतात असे सांगितले. हागवणे सर व प्रमुख पाहुणे कुमार गाजरे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य संजय कुलकर्णी सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी आदर बाळगावा व वाचनाकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन केले.

या दिवशी एक दिवसापुरते प्राचार्य म्हणून अस्मिता शिंदे हिने काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचिता यलमार हिने तर आभार प्रदर्शन हर्षिता यलमार हिने केले.
ह्या शिक्षक दिनाचे कार्यक्रम 12वी तील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यशस्वीरित्या पार पाडला.