*सराईत वाळु तस्कर सुरज उर्फ अंबान्या पवार एम.पी.डी.ए कायदयांनुसार येरवडा कारागृहात स्थानबध्द* *पंढरपूर शहर पोलिस स्टेशनची कामगिरी*

*सराईत वाळु तस्कर सुरज उर्फ अंबान्या पवार एम.पी.डी.ए कायदयांनुसार येरवडा कारागृहात स्थानबध्द*  *पंढरपूर शहर पोलिस स्टेशनची कामगिरी*

पंढरपूर/प्रतिनिधी 

           पंढरपूर शहर  पोलीस ठाणे हददीत अवैधपणे वाळु उपसा करून ,ती बेकायदेषीपणे विक्री व्यवसाय करणारा वाळु तस्कर, तसेच शरीराविषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार रा.फुट रस्ता,कोर्टी ता.पंढरपूर जि.सोलापुर  हा  अवैधरित्या वाळु चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवण्या करीता वाळुचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे ,तसेच पंढरपूर शहर  व पंढरपूर शहर लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वाळु) चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती. जे की, भारतीय न्याय संहिता 2023 मधीत प्रकरण 6 व 17 मधील अपराधी स्वरूपाची कृत्ये असून सदरची कृत्ये करण्याची त्यास सवय जडली होतीे.एक धोकादायक व्यक्ती म्हणुन त्याने स्वतःला सिध्द केले होते .त्याचे विरूध्द अनेकवेळा वाळु व्यवसाय तसेच शरीराविषयी गुन्हे दाखल होवुन त्यामध्ये अटक करण्यात आली होतीे परंतु तो सदर गुन्हयात जामीन मिळवुन अवैध वाळु व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता त्यांनतरही त्याचेवर टेंभुर्णी पो.ठाणे गुरनं 591/2025 भादवि कलम 483,109,189(2) सह आर्म अॅक्ट कलम 3,25,27 वगैरे प्रमाणे " खुनाचा प्रयत्न" या शिर्षकाखाली गंभीर गुन्हा दाखल झाला होता तो कायदयाला जुमानत नव्हता. म्हणुन सराईत वाळु तस्कर गुन्हेगार सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार रा.फुट रस्ता,कोर्टी ता.पंढरपूर जि.सोलापुर याचेविरूध्द  पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टी व औषधी द्रव्य विशयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्षन करणारे व्यक्ती, अत्यांवष्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे, विषयीचा  कायदा सन 1981 मधिल कलम 3(1) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव मा.पोलीस अधिक्षक साो,सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी साो सोलापुर यांना पाठविणेत आला होता.त्याअनुषंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन त्यांनी एम.पी.डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेष पारीत केलेने त्यास ताब्यात घेवुन ‘‘येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षकरीता स्थानबध्द करण्यात आले आहे.

.’पंढरपुर शहरातील वाळु तस्कर व शरीराविषयीचे गुन्हे करणारे व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.    सदरची कामगीरी ही मा.पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी  (भा.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर , सहा. पोलीस अधिक्षक, प्रशांत डगळे (भा.पो.से), पंढरपूर विभाग,पंढरपुर पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण, तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे,  मार्गदर्षनाखाली,स.पो.फौ कल्याण ढवणे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सचिन हेंबाडे,दिपक नवले,हर्षद ठाकर स्थानिक गुन्हे शाखेचे अनिस षेख तसेच सायबर सेलचे रतन जाधव यांनी केली आहे.