*गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट,  डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी* *जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेकडून अधिसूचना जारी* *पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली माहिती*

*गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट,  डॉल्बी सिस्टीम वापरास बंदी*  *जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचेकडून अधिसूचना जारी*  *पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली माहिती*

         पंढरपूर:/प्रतिनिधी 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व  लेझर लाईटचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. डॉल्बी सिस्टीम व   लेझर लाईटमुळे मिरवणूक बघण्यास आलेल्या नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करता जिल्हयात दि 27 ऑगस्ट ते दि. 06 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व   लेझर लाईटचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. याबाबतची अधिसूचना  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी दिली   

       सोलापूर जिल्हयामध्ये  गणेश उत्सव सण पारंपारिक पध्दतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून मोठया प्रमाणात मिरवणुकांचे आयोजन केले जाते. सदर मिरवणुकीमध्ये गणेश उत्सव मंडळाकडून डॉल्बी सिट्रीम व व्हा लाईटचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेश मुर्ती आगमन मिरवणुकीवेळी मिरवणूक वघण्याकरीता आलेल्या भाविकांना डॉल्वी सिस्टीममुळे काही व्यक्तींना कानाचा व छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आलेली आहे. तसेच लेझर नाईट डोळयावर पडल्यास वयोवृध्द व लहान मुलांच्या डोळयाचा पडद्याला तसेच बुबळाला इजा झालेल्या घटना घडलेल्या आहेत. 
           त्यामुळे मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध करणे आवश्यक असलेने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नारिक सुरक्षा संहिता 2023 चे कलग 163 (1) अन्वये, प्राप्त अधिकारानुसार  दि 27 ऑगस्ट ते दि. 06 सप्टेंबर 2025 या कालावधीत सोलापूर जिल्हयामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून आयोजित मिरवणु‌कीमध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी सिस्टीम व  लेझर लाईटचा शो वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
                 सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती  फौजदारी कारवाईस पात्र राहतील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी  श्री इथापे यांनी दिली