*पाणी व खताचे योग्य व्यवस्थापन ठरेल उत्पादनवाढीची गुरुकिल्ली-कृषिकन्या मानसी गोडसे*

*पाणी व खताचे योग्य व्यवस्थापन ठरेल उत्पादनवाढीची गुरुकिल्ली-कृषिकन्या मानसी गोडसे*

पंढरपूर;-प्रतिनिधी

            खत आणि पाणी या दोन घटकांची गणना शेतीसाठी अत्यावश्यक घटकांमध्ये केली जाते पिकाच्या भरघोस वाढीसाठी पाणी आणि खताचे व्यवस्थापन अत्यंत गरजेचे आहे असे मत कृषिकन्या मानसी मधुकर गोडसे हिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत व्यक्त केले.
                 पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पिकाला लागणारे पाणी आणि खत याची गरज वेगवेगळी असते पिकाच्या गरजेनुसार आणि योग्य वेळी पाणी आणि खताचा योग्य वापर केला पाहिजे असे मार्गदर्शन कृषिकन्या मानसीने शेतकऱ्यांना केले त्यामध्ये तिने खताच्या वापराच्या योग्य पद्धती तसेच वेगवेगळ्या पिकांची नत्र,स्फुरद, पलाश याची गरज वेगवेगळी कशी असते हे सांगितले तसेच पाणी व्यवस्थापनाबाबत बोलत असताना तिने ठिबक सिंचनाचे महत्व तसेच त्यातून होणारी पाण्याची बचत व पिकांना होणारा योग्य पाणीपुरवठा या गोष्टी शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या त्यासाठी तिला विषय शिक्षक प्राध्यापक.एस.एस भोसले तसेच त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
          यावेळी कान्हापुरी गावातील शेतकरी पोपट फराडे ,संतोष फराडे सोमनाथ शिंदे ,शुभम फराडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.