*पंढरीतील वडार समाज भवनासाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर* *पंढरीतील नेतेमंडळींनी पालकमंत्र्यांचे मानले आभार*
पंढरपुर /प्रतिनिधी
पंढरपूर शहरातील वडार समाज भवनासाठी तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी , १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात मनसे नेते दिलीप धोत्रे आणि शिष्टमंडळाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेत , त्यांचे आभार मानले आहे.
पंढरपूर शहरात वडार समाज बहुसंख्येने आहे. येथील सर्वे नंबर ७१ मध्ये वडार समाज भवन व्हावे , अशी इच्छा या समाज बांधवांनी व्यक्त केली होती. यासाठी निधी आणण्याचे प्रयत्न होत होते.जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी प्राप्त करण्यासाठी हालचाली सुरू होत्या .यास आता यश आले आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
या निधीतून समाजभवन, ग्रंथालय, अभ्यासिका , अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासूनचा वडार समाजभवनाचा प्रश्न , या निधीमुळे निकाली निघणार आहे. यासाठी मनसे नेते दिलीप धोत्रे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सुळे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे ,नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, नगरसेवक अंबादास धोत्रे, वडार समाजाचे अध्यक्ष दत्ता भोसले, शहर अध्यक्ष पिंटू पवार, रामा चौगुले, अण्णासाहेब जाधव आदींच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर येथे भेट घेतली या भेटीत त्यांचे मनापासून आभार मानले.