*सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अलका गुजरे-जमदाडे यांची निवड*

*सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अलका गुजरे-जमदाडे यांची निवड*

*सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी अलका गुजरे-जमदाडे यांची निवड

पंढरपूर/प्रतिनिधी 

: सोलापूर जिल्हा जि.प., नप, मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत *पंढरपूर* येथील  सेवानिवृत ज्येष्ठ शिक्षिका *अलका गुजरे-जमदाडे मॅडम* यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

ही निवड दि.*13जुलै2026* सोमवार रोजी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत पुढील तीन वर्षांसाठी करण्यात आली. याबतचे निवडपत्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक *बाळासाहेब काळे गुरुजी* यांच्या हस्ते अलका गुजरे जमदाडे मॅडम यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष  *शिवानंद भरले गुरुजी,धसाडे गुरुजी, फुलारी गुरुजी, उत्तम जमदाडे गुरुजी, अण्णासाहेब पवार गुरुजी*, आणि *मा .प्राचार्य हणमंतराव जमदाडे सर, माळी मॅडम, खूळपे मॅडम, जगताप मॅडम* आदी मान्यवर उपस्थित होते.

अलका गुजरे-जमदाडे मॅडम यांच्या निवडीबद्दल सर्व उपस्थितांनी अभिनंदन केले व संघटनेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.