*डी.ए.व्ही चा विद्यार्थी विवेक विष्णू फडके यांची MBBSसाठी निवड* *करकंब येथील डी.ए.व्ही शैक्षणिक संकुलाच्या गुणवत्तेत आणखीन एक मानाचा तुरा....*
करकंब प्रतिनिधी:-
*दयानंद शिक्षण संस्थेच्या करकंब येथील डी. ए. व्ही. महात्मा आनंद स्वामी सरस्वती आर्ट सायन्स ज्यु. काॅलेज चा HSC बॅच 2020 चा विद्यार्थी कु. विवेक विष्णु फडके यांची सिंधुदुर्ग येथे MBBS साठी निवड झाली आहे.*
*शिष्यवृत्ती परीक्षा,NMMSपरीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, मंन्थन परीक्षा, चित्रकला ग्रेड परीक्षा, सैनिक स्कूल सातारा परीक्षा अश्या विविध परीक्षा बरोबरच आज सिंधुदुर्ग येथीलMBBS साठी प्रशालेतील विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला.*
*या यशाबद्दल प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.यावेळी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.