*नागरिकांनी ग्राहक चळवळीत सहभागी व्हावे*- *ग्राहक पंचायतीचे आवाहन*

*नागरिकांनी ग्राहक चळवळीत सहभागी व्हावे*- *ग्राहक पंचायतीचे आवाहन*

पंढरपूर:-प्रतीनिधी

नागरिकांना अनेक ठिकाणी अडचणींना तोंड द्यावे लागते त्यासाठी जास्तीत जास्त नागरीकांनी ग्राहक चळवळीत सामील व्हावे असे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायतीचे  जिल्हा संघटक  शशिकांत हरिदास यांनी केले.
 ६,सप्टेबर हा दिवस 
अ.भा.ग्राहक पंचायतीचा स्थापना दिन आहे.
१९७४ साली पुण्यामध्ये स्व. बिंदुमाधव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अ.भा. ग्राहक पंचायतीची स्थापना केली.
*४८ व्या स्थापना दिनानिमित्त* प्रारंभी जेष्ठ नागरीक संघाचे तालुका सचिव बाळकृष्ण टकले, तसेच भाऊसाहेब पिंपळनेरकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर ग्राहक चळवळीबद्दलची सविस्तर माहिती जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी दिली.
प्रास्ताविक तालुका उपाध्यक्ष पांडुरंग अल्लापूरकर यांनी केले.तर आभार जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांनी मानले. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य पंचायतीचे जेष्ठ कार्यकर्ते नंदकुमार देशपांडे,कर सल्लागार गजानन मंगसुळे, परिसरातील नागरीक इ.उपस्थित होते.
यावेळी ग्राहक पंचायतीच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ गजानन मंगसुळे यांचे हस्ते करण्यात आला.